पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ श्रीमद्भगवद्गीता. एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥ संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनिब्रह्म न चिरेणाधिगच्छति ॥६॥ मिळते. (५) ज्या (मोक्ष-) स्थानी सांख्य (मागीतले लोक) पोचतात, तेथेच योगी म्हणजे कर्मयोगीहि जातात. सांख्य आणि योग है ( दोन मार्ग अशा रीतीने ) एकच आहेत हे ज्याने पाहिले त्यानेच (खरे तरव) ओळखिले म्हणावयाचें. (६) संन्यास झाला तरी हे महाबाहो! तो योगा- खेरीज म्हणजे कमीखेरीज प्राप्त होणे दुर्घट होय. जो मुनि कर्मयोगयुक्त झाला त्याला ब्रह्माची प्राप्ति होण्यास उशीर लागत नाही. सांख्यमार्गाने जो मोक्ष मिळतो तोच कर्मयोगाने म्हणजे कमें न सोदितां कसा मिळतो याचे सविस्तर निरूपण पुढे ७ व्या अध्याया- पासून १७ व्या अध्यायापर्यंत केलेले आहे. सध्यां एवढेच सांगणे आहे की, मोक्षदृष्टया दोहोंत काही फरक नसल्यामुळे अनादि कालापासून चालत आलेल्या या दोन मार्गातील भेद फुगवून दाखवून स्याकरिता तंटे करीत बसणे योग्य नव्हे; आणि पुढेहि हाच युक्तिवाद पुन:पुनः आलेला आहे (गी. ६.२ व १८. १,२ व त्यावरील टीका पहा). "एक सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति" हाच श्लोक थोड्या शब्दभेदाने महाभारतांतहि दोनदा आला आहे (शां. ३०५. १९,३१६.४) संन्यासमार्गात ज्ञान प्रधान मानिले तरी त्या ज्ञानाची सिदि कर्मे केल्याखेरीज होत नाही, आणि कर्ममार्गात कर्मे करीत अस- तात तरी ती ज्ञानपूर्वक असल्यामुळे प्रक्षप्राप्ति व्हावयाची रहात नाही (गी ६.२); मग दोन मार्ग निरनिराळे आहेत, असें बंड माजवि. ण्यांत काय हशील? कम करणेच बंधक म्हणावे तर तो आक्षेपहि निष्काम कर्मास लागू होत नाही असे आता सांगतात-]