पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ५. १॥ निद्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते ॥३॥ सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पंडिताः । एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विदते फलम् ॥४॥ यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। उपनिषदद्वाक्याशीच गीतेची एकवाक्यता करणे युक्त नाही. उपनिषदांत वर्णिलेला हा संन्यासमार्ग मोक्षप्रद नव्हे असे गीतेचे म्हणणे नाही. पण कर्मयोग व संन्यास हे दोन्ही मार्ग जरी सारखेच मोक्षप्रद आहेत, तरी म्ह० मोक्षदृष्टया दोहोंचे फल एकच असतांहि, जगाच्या व्यवहा- राचा विचार करितां ज्ञानोत्तरहि निष्काम बुद्धीने कर्मे करीत रहाणे, हाच मार्ग अधिक प्रशस्त किंवा श्रेष्ठ होय असे गीतेचे ठाम मत आहे. आम्ही लाविलेला हा अर्थ गीतेवरील बहुतेक टीकाकारांस मान्य नसून त्यांनी कर्मयोग गौण ठरविला आहे. पण आमच्या मते हे अर्थ सरळ नव्हेत; व गीतारहस्याच्या अकराव्या प्रकरणांत (विशेषत: पृ. ३०१-२०९) याच्या कारणांचे सविस्तर विवेचन केले असल्यामुळे येथे जास्त सांगून जागा अडवीत नाही. दोहोंपैकी अधिक प्रशस्त मार्ग कोणता याचा निर्णय याप्रमाणे सांगि- तल्यावर व्यवहरांत लोकांस हे दोन मार्ग जरी भिन्न दिसले तरी तत्वत: ते दोन नाहीत असें आतां सिद्ध करून दाखवितात- (३) जो (कशाचाहि) द्वेष करीत नाही आणि (कशाचीही) इच्छा करीत नाही, तो पुरुष (कम) करूनहि निस्यसंन्यासी समजावयाचा; कारण, हे महा बाहो अर्जुना ! (सुखदुःखादि) द्वंद्वांपासून मुक्त झाला तो अनायाच (क- मांच्या सर्व) बंधांपासून मुक्त होतो. (४) सांख्य (कर्मसंन्यास) आणि योग (कर्मयोग) भिम आहेत असे मूर्ख लोक म्हणतात; पंडित तसें म्हणत नाहीत. कोणताहि एक मार्ग चांगल्या तनेने आचरिल्यास दोहोंचे फल - - -- - - - - - - - - - -