पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० श्रीमद्भगवद्गीता. $ शेयः स नित्यसंन्यासी यो न वेष्टि न कांक्षति । -हे उत्तर आहे. तथापि हा सिद्धान्त ज्ञानोत्तर सर्व कर्माचा स्वरूपतः संन्यासच केला पाहिजे, या सांख्य मार्गास इष्ट नसल्यामुळे या स्पष्टा- र्थक प्रश्नोत्तरांची कित्येकांनी फुकट ओढाताण करूनहि मेव्हां निभाव लागेना तेव्हां विशिष्यते' (योग्यता किंवा मातब्बरी विशेष) या पदाने भगवंतांनी कर्मयोगाची अर्थवादात्मक ह्मणजे पोकळ स्तुती केली आहे, भगवंतांचा खरा अभिप्राय तसा नव्हे, असा शेरा मारून कसे तरी आपले समाधान करून घेतले आहे ! ज्ञानोत्तर कमें नकोत असे जर भगवंतांच मत असते तर अर्जुनाला " या दोहोंपैकी संन्यास श्रेष्ठ" असे उत्तर भगवंतांस देता येत नव्हते काय! पण तसे न करितां " कम करणे व कर्म सोडणे हे दोन्ही मार्ग सारखेच मोक्षप्रद आहेत" असे दुसऱ्या श्लोकाच्या पहिल्या चरणांत सांगि. तिल्यावर पुढे 'तु' झणजे 'पण' हे पद घालून तयोः ' ह्मणजे या दोन मार्गीपैकी कर्मे सोडण्याच्या मार्गापेक्षां कर्मे करण्याचा पक्षच अधिक प्रशस्त (श्रेय) होय, असें ज्या अर्थी भगवंतांचे निःसंदिग्ध विधान आहे, त्या अर्थी साधनावस्थेत ज्ञानप्राप्तीसाठी जी निष्काम कर्मे करावयाची तीच पुढे सिद्धावस्थेतहि लोकसंग्रहार्थ ज्ञास्याने आमर- णान्त कर्तव्य म्हणून चालू ठेविली पाहिजेत हेच मत भगवंतास ग्राह्य आहे असें पूर्ण सिद्ध होते. गीता ३.७ यांत हाच अर्थ वर्णिला असून विशिष्यते' हेच पद तेहि आहे, व त्याच्या पुढील श्लोकांत म्हणजे गीसा ३.८ यांत " अकर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ" असेहि पुनः स्पष्ट शब्द आहेत. आता हे खरे आहे की, उपनिषदांतून कित्येक ठिकाणी (वृ. ४. १.२२) ज्ञानी पुरुष लोकेषणा, पुत्रैषणा वगैरे न ठेवितां भिक्षा मागत हिंडत असतात असे वर्णन आहे. पण ज्ञानोत्तर हा एकर मार्ग आहे, दुसरा नाही, असे उपनिषदांतहि म्हटलेले नाही म्हणून केवळ वरील