पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः । कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥ $$ किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः । तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥ कर्माची बाधा लागत नाही, याचे कारण ते फलाशा ठेवून कर्म करीत नाहीत हे होय; आणि हे जाणून त्याप्रमाणे जो वागतो त्यास कर्माचा बंध लागू शकत नाही असा एकंदर भावार्थ आहे. या श्लोकांतील सिद्धान्तच प्रत्यक्ष उदाहरणाने आतां दृढ करितात--] (१५) हे जाणून पूर्वीच्या देखील मुमुक्षु लोकांनी कर्म केले; तस्मात् पूर्वीच्यांनी पूर्वपूर्व केलेले कर्मच तूं कर । । [मोक्ष आणि कर्म यांचा याप्रमाणे विरोध नाही म्हणून तूं कर्म कर असा अर्जुनाला निश्चित उपदेश केला. परंतु, मग "कम सोडिल्याने म्हणजे अकर्मानेच मोक्ष मिळतो" असे जे संन्यासमार्गीयांचे मत यांतील बीज काय ही शंका येत्ये; म्हणून कर्म कोणते याच्या पिचेच. नास आतां सुरुवात करून अकर्म म्हणजे कर्मत्याग नव्हे, निष्काम कर्मालाच अकर्म म्हणावयाचे, असा अखेर तेविसाव्या श्लोकांत सि- द्धान्त करितात.] (१६) कर्म कोणते व अकर्म कोणते, या बाबतीत शहाण्या पुरु- षांना देखील भ्रम पढन असतो; (म्हणून) जें जाणिल्यॉन पापापासून मुक्त होशील अशा रीतीचें कर्म कोणते ते तुला सांगतो. । ['अकर्म' हा नञ् समास आहे व त्यांतील अनञ् या शब्दाचा व्याकरणरीत्या अभाव' किंवा 'अप्राशस्य ' असे दोन्ही अर्थ होऊ शकतात,