पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ चातुर्वर्ण्य मयों सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम् ॥ १३ ॥ न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा। इति मां योऽभिजानाति कर्मभिन स बयते ॥ १४॥ आतां धर्मसंस्थापना करण्याला काय करावे लागते ते थोडक्यांत सांगतात--] (१३) (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या प्रकार ) चार वर्णीची व्यवस्था गुण व कर्म यांच्या भेदाप्रमाणे मीच निर्माण केली आहे. मी तिचा कर्ताहि आहे, आणि अकर्ता म्हणजे ती न करणारा अध्यय (मीच) आहे, हे तूं लक्षात ठेव. [परमेश्वर कर्ता असला तरी पुढील श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे तो नेह- मीच निःसंग असल्यामुळे अकाच होय असा अर्थ आहे (गर्हता. ५.१४ पहा). 'सर्वेद्रियगुणाभासं सर्वेद्रियविवर्जितं' अशी दुसरीहि परमेश्वरस्व- रूपाची पुढे (गी, १३.१४) विरोधाभासात्मक वर्णने आहेत. चातुर्व- पर्याच्या गुणभेदाचें निरूपण पुढे अठराव्या अध्यायांत (१८.४१-४९) केले आहे ते पहा. आतां "करून न करणारा " असे जे भगवंतांनी आपले वर्णन केले त्यांतील मम सांगतात---] (१४) मला कर्माचा लेप म्हणजे बाधा लागत नाही. (कारण) माझी कर्माच्या फलाचे ठायीं इच्छा नाही. अशा प्रकारे जो मला जाणितो त्याला कर्माची बाधा होत नाही. ! [माझे जन्म व कर्म जाणितो तो मुक्त होतो असें जें वर नवव्या लोकांत सांगितले त्यापैकीच 'कर्मा'च्या तावा, या श्लोकांत स्पधी- करण केले आहे. 'जाणितो' या शब्दाने “जाणून त्याप्रमाणे वागू ला- गतो"एवढा अर्थ या ठिकाणी विवक्षित आहे. भगवंतांना त्यांच्या