पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४०॥ तस्मात्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥११॥ $$ इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिों वुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना। जहि शत्रु महाबाहो कामरूपं दुरासदम् ।। ४३ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिपरसु ब्रह्मविद्यायो योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन- संवादे कर्मयोग नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ।। वाढत जातो-असे जे मनूने झटले आहे; त्याचाच हा अनुवाद आहे (गीतार. प्रकरण ५ पृ. १०५ पहा).] (१०) इंद्रिये, मन आणि बुद्धि, ही याचे आधिष्ठान म्हणजे घर किंवा किल्ला हटले आहे. यांच्या आश्रयाने दास्याला गुंडाळून ठेवून मनुष्याला हा भुरळ पाडीत असतो (४१) म्हणून, इंद्रियांचे प्रथम संयमन करून हे भरतश्रेष्ठा ! ज्ञान (अध्यात्म) आणि विज्ञान (विशिष्ट ज्ञान) यांचा नाश करणाच्या याच पाप्याला तूं ठार मारून टाक. (४२) असे म्हणतात की, (स्थूल बाह्य पदार्थाच्या मानाने से पदार्थ जाणणारी) इंद्रियें पर म्हणजे पलीकडची, इद्रियांच्या पलीकडचे मन, मनाच्याहि पलीकडे (व्यवसायात्मक) बुद्धि, आणि जो बुद्धाच्याही पलीकडे तो (आत्मा) आहे. (४३) याप्रमाणे बुद्धीच्या पलीकड. ल्याला ओळखून व आपणच आपल्याला आंवरून धरून, हे महाबाहो अर्जुना ! दुरासाध्य कामरूपी शत्रूला तूं मारून टाक.