पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३. ब्रा. २ त्याच्यापासून उत्पन्न झालेली अविद्या ( मृगजळाला आधारभूत होणारी ) नापीक जमीनीसारखी असते; त्यामुळें ( पुरुष ) परमात्मस्वरूपापासून भिन्न असतो आणि भोग्य पदार्थापासून दूर होऊन त्याच्या कामना व त्याची कर्मे उच्छिन्न होतात; तो अंतराळीं राहतो. त्याची आपण व परमात्मा एकच आहों अशा दृष्टीनें द्वैतदृष्टि दूर व्हावयाची असते, ह्मणून त्यानंतर परमात्मविचार आरंभावयाचा असतो. ह्मणून या प्रकारची दरम्यान एक मुक्तस्थिति झणजे अंतराळी राहणें कल्पून (त्या कल्पनेशीं) पुढील ग्रंथाचा संबंध जोडतात. २० त्याजवर विचारावें कीं, इंद्रियें गळाल्यावर देहरहित पुरुषाला परमात्म्याचें दर्शन, श्रवण, मनन, व निदिध्यासन कसें व्हावें ? ते ह्मणतात पुरुषाचे प्राण लीन झाले, आणि तो नामशेष झाला तरी (ह्या क्रिया चालतील; ) कारण (मागील) श्रुतीत 'मेलेला तो निजतो' असेंच ह्मटलें आहे; (पण) मनोराज्यांतही हें श्रवण वगैरे सिद्ध करणे शक्य नाही. आतां अन्यपक्षीं जिवंत असतांनाच अविद्या मात्र शिलक राहिली, (आणि) भोग्य विषयांतून निवृत्त झाला, असें कल्पिलें तर तें तरी कोणत्या हेतूनें हें विचारावें. समस्त द्वैताला एकरूपता देऊन आत्मप्राप्ति करण्याचे हेतूनें तो राहतो, असें ह्मणण्यांत येईल तर तें (आह्मीं) पूर्वीच मोडून काढले आहे. कर्मसहित द्वैत एकरूप आहे, अशा आत्मज्ञानानें परमात्म्याचें दर्शन घेणारा विद्वान् मेला व त्याचे प्राण लीन जाले, तर तो ( विराटस्वरूप ) जगदात्मा हिरण्यगर्भ होईल, अथवा प्राण लीन न होतां जिवंत- पणींच भोग्य वस्तूंपासून निवृत्त होऊन विरक्त होत्सातां परमात्म्याचे दर्शनांत राहील. पण ह्या दोन्ही गोष्टी ( हिरण्यगर्भपदप्राप्ति व भोगनिवृत्ति ) एकाच तऱ्हेच्या प्रयत्नानें उत्पन्न केलेल्या साधनानें प्राप्य नाहीत. हिरण्यगर्भस्वरूपाची प्राप्ति होण्यास साधन असेल, तें विषयनिवृत्तीला साधन होणार नाही. विषयनिवृत्ति परमात्मदर्शनाला साधन असेल, तर ती हिरण्यगर्भस्वरूपप्राप्तीला साधन होणार नाहीं; कारण जें गतीचें साधन असतें तें गतिनिव- तीला ( अगतीला ) कारण होत नाहीं. एकपक्षी (कर्मकरून ) मरण पावून, हिरण्यगर्भ- स्वरूपांत जाऊन, प्राणलीन केले, व नामरूपानें बाकी राहिला तर परमात्मज्ञानाचा अधिकारी होईल, ( पण ) त्यापक्षी आमच्या सारख्यास ( मनुष्यस्थितीत असणाऱ्यांस ) परमात्मज्ञा- नाचा उपदेश व्यर्थ होईल. " जो जो कोणी देवांपैकी असेल " इत्यादि श्रुतीनें ब्रह्मविद्येचा उप- देश ( मोक्षरूपी ) पुरुषार्थ सिद्ध होण्याकरितां सर्वोस केला जातो. यावरून ( हिरण्यगर्भ झाल्यावर ब्रह्मोपदेश व्हावयाचा वगैरे ) ही कल्पना अत्यंत निकृष्ट व शास्त्रबाह्य आहे. आतां प्रकृत (श्रुतीचें ) व्याख्यान करूं. ग्रहातिग्रहरूप बंधन कोणी उत्पन्न केलें, याचा निर्णय करण्याकरितां (श्रुति ) ह्मणते- - ह्या डोकें, हात, पाय इत्यादि अवयवांनी युक्त अस णाऱ्या अल्पज्ञानी मरणाराची वाणी अग्नीत मिळते, प्राण वायूंत मिसळतो, चक्षु आदित्याप्रत -आपले आत्मस्वरूपच मूळच्या अज्ञानाला (अविद्येला) उत्पत्तिस्थान आहे असा वेदांतशास्त्राचा सिद्धात आहे. २ - मेल्यावर ज्ञानसहित कर्मानें हिरण्यगर्भ स्वरूप प्राप्त होते त्यांत भोगनिवृत्ति नाहीं, पण नंतर परमात्मदर्शनाविषयों प्रयत्न करणे हा एक पक्ष, जिवंतपणींच कर्मापासून निवृत्त होणें व पुरमात्मदर्शन घेणें हा दुसरा पक्ष ह्या उभयपक्षी परमात्मदर्शनास कर्म कारण आहे असें ह्मणतां येत नाहीं, ३ -- " तद्यो यो देवानाम् "