पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १० - १३] आर्तभागब्राह्मण ग्रहातिग्रहमुक्ति. ऋचा १२-–याज्ञवल्क्या, अशी हाक मारून पुन्हा (आर्तभाग) ह्मणाला. जेव्हां हा पुरुष मरतो, (तेव्हां ) त्याला काय सोडीत नाहीं ? ( उत्तर ) नाम ( नांव ). नाम खरोखरी अनंत आहे, आणि विश्वेदेव (सर्व देव) अनंत आहेत; ह्मणून तो अनंतलोकांप्रत पावतो. भाष्य-- मुक्त पुरुषाचे प्राण मात्र लीन होतात, किंवा प्राणाची सर्व कारणें देखील लीन होतात ? आतां (एकपक्षी) प्राणच तेवढे लीन होतात; त्यांची सर्व कारणें लीन होत नाहींत.. कारणें विद्यमान असली तर प्राणांची पुन्हां गांठ पडेल. आतां (अन्यपक्षी ) सर्व कामना व कर्मों वगैरे (कारणें ) ही लीन होतात, असें ह्मटलें तरच मोक्ष होणें युक्त होतें; अशा अर्थी पुढील प्रश्न आहे. याज्ञवल्क्या, अशी हाक मारून (आर्तभागानें ) भाषण केलें कीं, जेव्हां हा पुरुष मरतो ( मृतवत् भासतो), (तेव्हां ) त्याला काय सोडीत नाहीं ? दुसरा ( याज्ञवल्क्य ) ह्मणतो; नाम. सगळें कांहीं लीन होतें असा अर्थ घ्यावयाचा; परंतु नाम मात्र लीन होत नाहीं; कारण त्याचा शरीररूप ) आकृतीशी संबंध आहे. नाम नित्यच आहे, अनंतच आहे. नाम नित्य असणें हाच त्याचा अनंतपणा. नामाच्या आनंत्यानें युक्त असलेले विश्वेदेवही अनंतच आहेत. त्यामुळे तो अनंत लोक जिंकितो. त्या नामाच्या अनंतपणाप्रत पावलेले विश्वेदेवांप्रत, ते आत्म- स्वरूप आहेत असें पाहून तो अनंतपणा पाहिल्यामुळे, (मुक्तपुरुष ) अनंत लोकांप्रत जातो. ऋचा १३––( आर्तभागानें ) याज्ञवल्क्या, अशी हाक मारून पुन्हा भाषण केलें. जेव्हां ह्या मेलेल्या पुरुषाची वाणी अग्नीमत जाते, प्राण वायूमत, चक्षु आदित्याप्रत, मन चंद्राप्रत, कान दिशांप्रत, शरीर पृथ्वीमत, आत्मा ( हृदय ) आकाशामत, लव औषधीमत, व केंस वनस्पतींप्रत जातात, रक्त व रेत जलांत ठेविले जातें, तेव्हां हा पुरुष कोर्टे असतो ? ( उत्तर ) सच्छिष्या आर्तभागा, तुझा हस्त इकडे आण, आपण दोघेच याविषयीं ज्ञान संपादन करूं. आपली ही ( वस्तु) मंडळी जमलेल्या या ठिकाणीं ठरणार ) नाहीं. ( असे बोलून ) ते दोघे तेथून दूर जाऊन ( आपसांत ) विचार करूं लागले; व ते दोघे, (शेवटीं ) जें बोललें, तें कर्माविषयींच बोलले. त्या दोघांनी जें वाखाणलें, तें कर्म वाखाणिलें. पुण्यकर्म केल्याने पुण्यवानच होतो; पापकर्मानें पापी होतो. मग जारत्कारव आर्तभाग स्तब्ध राहिला. उपसंहार भाष्य – ग्रहातिप्रहरूप मृत्युरूपी बंधन सागितलें; आणि त्या मृत्यूचा मृत्यु (परमात्मज्ञान ) असल्यामुळे मोक्ष सिद्ध होतो. दिव्याच्या विझण्याप्रमाणे ग्रहातिग्रहांची ( भिन्न भिन्न ) स्वरूपें ह्या लोकींच लीन होणें तोच मोक्ष. जें ग्रहातिग्रह नांवाचें मृत्युरूप बंधन आहे, त्याची जीं कारणें, त्यांचे स्वरुपाचा निर्णय करण्याकरितां या (ग्रंथा ) चा आरंभ आहे. 'याज्ञवल्क्या, अशी हाक मारून बोलला वगैरे.' 6 या प्रकरणाच्या संबंधानें, कित्येक (आचार्य ) अशी व्याख्या करितात की, कारणसहित ग्रहातिग्रहांचा नाश झाला तरी ( पुरुष ) मुक्त होत नाहींच नामशेष राहतो. आणि १ - न्यायदर्शन वादी.