[ ६ ] प्रभो षडरी हे गांजिती भारी, सोढवा, बांचवा, उद्धार. करावा, मोक्षपथ दावा तारी ह्या संसारी ॥ १ ॥ पड़ ११ वें. प्रभुराज मानण्याला जागं हिंद देश झाला ॥ ध्रु० ॥ सौवर्ण खाणि असती । मोतीं तसेच निघती । धनधान्य देत सुटला । जागं हिंद देश झाला ॥ १ ॥ किति सत्य प्रोम येथे । जगमान्य द्रव्य दाते । त्या जन्म द्यावयाला । जागं हिंद देश झाला ॥ २ ॥ विष्णूसमान ज्यांची । कीर्ति असे सदाची । तप मूर्ति रत्नमाला । जागं हिंद देश झाला ॥ ३ ॥ वचनास देऊनियां | स्वप्नांत साधुराया | देई स्वराज्य मुनिला । जागं हिंद देश झाला ॥ ४ ॥ लंकेस जाउनिया | रणकंद रामराया । मारी दशाननाला | जागं हिंद देश झाला ॥ ५ ॥ कंसास मारण्याला प्रभु बालकृष्ण झाला । नीचास विंधण्याला । जागं हिंद देश झाला ॥ ६ ॥ राण कर्णवीर होता त्याच्या समान दाता । पुढती कधीं न झाला । जगिं हिंदू देश झाला ॥ ७ ॥ बीरा असे दरारा । होई सदा पुढारा । । तो पार्थ एक झाला । जर्मि हिंद देश झाला ॥ ८ ॥ होवोनि सारथीहि । गीतामृतास देई । तो कृष्ण येथ झाला । जार्ग हिंद देश झाला ॥९॥
पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/७
Appearance