पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘चीनमध्ये औद्योगिक क्रांती पूर्णत्वाला पोचली नसताना व साम्यवादी क्रांती खूप दूर असतानाच माओने ' कम्युन्स'चा प्रयोग केला.' मी.

‘चीनमध्ये भांडवलशाहीचा नाश केल्यानंतर हे प्रयोग माओने केले म्हणून ते यशस्वी ठरले. विनोबाप्रणीत ग्रामराज्ये म्हणजे कावळ्याच्या छत्र्या वाटतात. त्या टिकणाऱ्या नाहीत.' विद्यार्थी.

'चीनमध्ये माओलाही कम्युन्सचा प्रयोग थांबवावा लागला असे माझ्या वाचनात आलेले आहे आणि पॅरीसमध्ये स्थापन झालेली ही कम्युन्स तरी किती दिवस टिकणार आहेत अशी तुमची कल्पना आहे ? अशी कम्युन्स शंभर वर्षांपूर्वीही परसिमध्ये स्थापन झाली होती व काही दिवसात ती कोलमडूनही पडली होती. तरीही माक्र्स-लेनिन यांना या ‘कम्युन्स'चे विलक्षण आकर्षण वाटत होते. किबहुना ‘कम्युनिझम' हे ध्येय म्हणून युरोपात पुढे आले ते अशा तुरळकपणे उगवलेल्या कावळ्यांच्या छत्र्यांमुळेच, हेही आपण विसरता कामा नये. ध्येय म्हणून कम्युनिझमचा शोध मार्क्सने लावलेला नाही. हा शब्द, हे स्वप्न मार्क्सपूर्वकालीन आहे. मार्क्सने हे स्वप्न कम्युन्सच्या अपयशी व तुरळक प्रयोगातूनच उचलले आणि ते सत्यसृष्टीत उतरवण्याचा मार्ग मात्र नवा सांगितला- शास्त्रीय समाजवाद. तेव्हा आपल्याकडील ग्रामराज्ये तुरळक, अपयशी व जुनी म्हणून टाकाऊ का ठरावीत ?' मी.

'माक्स ने जसा खाजगी मालकीहक्काचे विसर्जन हा कम्युनिझमकडे जाण्याचा मार्ग सांगितला तसे विनोबांचे सांगणे कुठे आहे ? 'विद्यार्थी.

'सब भूमी गोपाल की' या विनोबांच्या घोषणेचा अर्थ काय ? घोषणा देऊनच विनोब थांबले नाहीत, त्यांनी भूदानग्रामदानाचा मार्गही दाखवून दिला.' मी.

'भूदान–ग्रामदान तर साफ फसले आहे. टाकाऊ जमिनी जमीनमालकांनी विनोबांना 'दान' म्हणून दिल्या आणि त्यांची फसवणूक केली.' विद्यार्थी.

'हे व्यावहारिक अपयश झाले. आपण तात्विक बाजूचा विचार करीत आहोत. 'नाबाचा ‘दान' या शब्दाचा अर्थ 'संविभागः', समान वाटप असा आहे. 'कयुन्स कोसळली; भूदान, ग्रामदान, ग्रामराज्ये ही कोसळण्यासाठी आहेत असे समजू. प्रश्न आहे तात्त्विक सारखेपणाचा.' मी.

'कयुन्स' आणि ‘भूदान-ग्रामदान–ग्रामराज्ये' यात काही सारखेपणा असेलही पण तो फार थोडा व दुर्लक्षणीय आहे. विद्यार्थी.

'डाव्या पक्षांनी या चळवळीकडे लक्ष पुरविले असते तर तो तसा थोडा' व 'दुर्लक्षणीय' राहिला नसता, असे नाही का तुम्हाला वाटत ? माओने एके

। ८९ ।