पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'हे खरे असले तरी पुढची पायरी म्हणून भांडवलशाहीच्या नाशावर आधारलेली पूर्वयुरोपाप्रमाणे एखादी कम्युनिस्ट राजवटच स्थापन व्हावी असे पॅरीसमधल्या बडखोरांना वाटत आहे.' विद्यार्थी एकमताने सांगतात.

'बंडखोरांची प्रेरणा स्पष्ट आहे पण प्रचलित अशी कुठलीच डावी व्यवस्था त्यांना मान्य नसण्याची शक्यता मला अधिक वाटते. त्यांना प्रचलित उजवे नकोत आणि डावेही नकोत असे दिसते. त्यांचा राग सर्वांवरच आहे. कुणावरच त्यांचा विश्वास दिसत नाही.' मी.

कुणीच या माझ्या विधानाला मनापासून होकार देत नाही. मार्क्स-लेनिन परंपरा क्रांतिकारक असली तरी कालबाह्य ठरू शकते हा विचारच त्यांना कदाचित या वयात मानवण्यासारखा नसावा.

चर्चा पुढे चालूच राहते. पण तत्पूर्वी...

बावीस मार्च १९६८. नाँतेर या उपनगरातील पॅरिस विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तर व्हिएटनामला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एक मोर्चा काढला. मोर्चात काही गैरप्रकार घडले, कॉलेज अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांवर रोष झाला, काहींवर शिस्तभंगाचा इलाज केला गेला. यातून परिस्थिती चिघळत गेली व शिस्तभंगाला बळी पडलेल्या विद्याथ्र्यांना पाठिंबा वक्त करण्यासाठी आणखी काही मोर्चे निघाले, निदर्शनांना सुरुवात झाली. प्रथम नाँतेर, नंतर लेटिन क्वार्टर्स, पॅरिस आणि शेवटी फ्रान्सच्या इतर भागातही हे लोण हळूहळू पसरत गेले.

ही बावीस मार्चची चळवळ सुरुवातीला एका लहानशा अतिजहाल डाव्या क्रांतिकारक गटापुरतीच मर्यादित होती. मुख्यतः या गटात अराज्यवादी, ट्रॉट्स्कीवादी, माओवादी विचारांच्या तरुणांचा भरणा होता. तेवीस वर्षाचा, याच कॉलेजचा 'समाजविज्ञान' शाखेचा कोहन बेंडिट हा विद्यार्थी या गटाचा नेता होता. याचा जन्म फ्रान्समध्ये, आई-वडील निर्वासित जर्मन ज्यु. बोलण्या-चालण्यात, वागण्यात-विचारात ज्वलज्जहाल व डोक्यावरचे केसही लाल यामुळे हा 'डॅनी दि रेड' या टोपण नावानेच विद्यार्थीवर्गात जास्त प्रसिद्ध होता. हर्बर्ट मार्क्युज (Marcuse) या अमेरिकन तत्त्वज्ञाचा हा आपल्याला शिष्य मानीत असल्याने मार्क्सवादी विद्यार्थी-संघटनांना व कम्युनिस्टांनाही तो कधीच जवळचा वाटला नाही. त्याच्या 'बावीस मार्च' चळवळीला तर या सर्वांनी प्रथमपासून विरोधच केला. उलट

ग्रा...६

। ८१ ।