पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि हे मुलांच्या तोंडचे घास आम्ही गिळावेत, याची शेतकरी म्हणून मला तरी लाज वाटली. आपल्या सर्वांनाच हे कळल्यावर ती वाटल्यावाचून रहाणार नाही. तूट-तूट ती आहे किती ? फक्त दहा टक्के. मला वाटतं आपण मनावर घेतले तर ही अन्नतूट भरून काढणे मुळीच अवघड नाही. नुसते उंदीर मारले तरी हा प्रश्न मिटल. शिवाय आपली उत्पादनाची ताकदही काही कमी नाही. आमच्या आजोबांना एकरी वीस टन ऊस निघाला की खुप निघाला असे वाटत असे. आज आम्ही एकरी शंभर शंभर टन पीक घेतो. गव्हाच्या, ज्वारीच्या बाबतीतही तेच. दोन वर्षांपूर्वी ' कुठूनही पाणी उचला' अशी सरकारने नुसती परवानगी दिली तर जामच्या तालुक्यातले गव्हाचे उत्पादन चौपट वाढले. आपण आता सरकारला सांगितले पाहिजे की, ही परदेशी अन्नमदत बंद करा, तूट भरून काढण्याइतकी ताकद आमच्यात आजही आहे ..'

'विनायकरावांनी निफाड तालुक्यातील 'परान्नमुक्त' अकरा गावांचे उदाहरण आपल्याला दिले. तुम्ही तेच गिरवा असे माझे म्हणणे नाही. स्थानिक परिस्थिती वगळी असण्याचा संभव आहे, तुमचा आविष्कार तुमच्या परिस्थितीनुरूप वेगळा असला तर काही बिघडणार नाही. स्वावलंबनाची प्रेरणा महत्त्वाची आहे, मार्ग वेगवेगळे असतील, नव्हे असणे चांगलेही. एकच चित्र सगळ्यांनी कशाला गिरवायच? प्रत्येकाने वेगळे रंग भरावेत, नवे नवे प्रयोग करावेत. हे सारखं नवं नव वडवण्याची, सतत धडपडण्याची वृत्ती आपल्यात निर्माण झाली नाही हे आपले गेल्या पास वर्षातील नियोजनाचे खरे अपयश आहे. परक्या, श्रीमंत देशांची नक्कल करून नाट होण्याचा आपण प्रयत्न चालविला आहे. तो चुकीचा आहे. याने आपण केंव्हाही मोठे होणार नाही, श्रीमंत होणार नाही. मोठेपणाचे व श्रीमंतीचे जे एक वेगळे तेज असते ते कधीही आपल्यावर चढणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही मंडळी येथे आलो आहोत. अन्न हा एक निकडीचा विषय निमित्त म्हणून घेतला आहे; पण त्यामागची मुख्य भावना आहे स्वतंत्रतेची. या संचलनाला अन्न विलंबन संचलन असेही म्हणता आले असते; पण मुद्दामच स्वतंत्रता संचलन असे म्हटले आहे. वीस वर्षांपूर्वी राजकीय स्वातंत्र्य आपल्याला लाभले; पण आपल्या पायांवर उभे रहाण्याची विद्या आपण हस्तगत केली नाही म्हणून आज आर्थिक गुलामगिरीत पुन्हा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपले तंत्र, आपली बुद्धी व आपली साधनसामग्री यांच्या बळावर, आपल्यालाच विकसित करावे लागते, शोधावे लागते. परदेशातून आयात करता येण्यासारखी ही वस्तु नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. परदेशातून फार तर निर्जीव, जड यंत्रसामग्री येऊ शकते; पण मागचे बुद्धिचैतन्य, ज्ञानविज्ञान येथेच खस्ता खाऊन, येथल्याच मातीत पिकवावे लागते. स्वाभाविक वाढ होण्यासाठी आपण प्रथम परदेशातील आयात कमी केली

। ७७ ।