पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतील अशा पाणीपुरवठ्याच्या क्षेत्रयोजना आम्हास दाखविल्या गेल्या. परंतु पंचायत समित्यांच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतही त्यांचा अंतर्भाव झालेला नव्हता. यामुळे ग्रामपंचायतींनी हाती घेतलेल्या योजनांना पैसे वाटप करणारी वरिष्ठ संस्था एवढेच स्वरूप या पंचायत समित्यांना येथे प्राप्त झाल्यासारखे दिसते. जुन्या विकासयोजनांपेक्षा हे स्वरूप काही फारसे भिन्न आहे असे वाटत नाही. (Report of a study team on Democratic Decentralisation in Rajastan, P. 12)

हाती सत्ता आहे, साधनेही आहेत. मग ग्रामीण जनतेला हवी असणारी व देशाच्या उत्पादनसामर्थ्यात वाढ करणारी पाणीपुरवठा योजनांसारखी थोडी धाडसाची व जबाबदारीची कामे पंचायत समित्यांनी अंगावर का घेऊ नयेत ? उत्तर स्पष्ट आहे. नवे कसदार नेतृत्व विकेन्द्रीकरणामुळे पुढे येईल ही अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शाळांच्या इमारती, दवाखाने, रस्ते इत्यादी बिनधोक्याची जी कामे ग्रामपंचायतीकडून वर आली तेवढी उरकली गेली. तसेच तगाईवाटप वगैरेत सुधारणा झाली. परंतु ' स्थानिक उपक्रमशीलता' (Local Initiative) वाढली नाही. कारण 'उपक्रम' म्हटला की, त्यात यशापयश आले, धोका आला. जनतेशी घनिष्ट व आंतरिक जिव्हाळ्याचे सच्चे ऋणानुबंध असतील तरच असे धोके पत्करण्याचे नैतिक धैर्य पुढाऱ्यांच्या ठायी निर्माण होते. ते पंचायत राज्यातील पुढाऱ्यांनी दाखविले नाही. याचा अर्थच नव्या पातळीवरचे नेतृत्व तेथे उदयास आले नाही असा होतो.

आंध्रमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच जिल्हा परिषदांना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. या ठिकाणचा अनुभव सांगताना निरीक्षक समितीच्या आंध्र प्रदेशाच्या पहाणीच्या अहवालात एके ठिकाणी म्हटले आहे--

The Zilla Parishad in Andhra Pradesh is looked upon by non official opinion as providing the least opportunity for participation in development activities. As one member of the Parishad expressed himself, what work would they have, after the non-Block areas are converted into regular Blocks, except passing the budgets of Panchayat Samities and distributing monies received from the Government amongst them ? (P. 33-34).

‘विकास योजनांच्या कामात पुढारीपण घेण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील जिल्हा परिषदांना केवळ नाममात्र संधी उपलब्ध आहे, अशी एक जाणीव या परिषदांच्या सर्वसाधारण लोकप्रतिनिधींच्या मनात घर करून बसलेली आहे. एकाने अगदी

। ४३ ।