पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर ! जे प्राचीनकाळी कार्थेजचे, अथेन्सचे झाले
किवा मोहोंजोदोरोचे झाले, ते उद्या आपलेही होईल. सोन्याची द्वारकाही जेथे
बुडाली तेथे आपला मुंबई-कलकत्ता संस्कृतीचा उसना बडिवार
किती काळ टिकणार !

कितीही वैभवशाली, दैदिप्यमान, पुढारलेल्या वगैरे असल्या तरी
केवळ शहरी संस्कृतींचा समूळ विनाश हा अटळ असतो. ग्रामीण
आणि नागर या दोन संस्कृतींचा समन्वय, एक विशिष्ट तोल ज्या
समाजांनी साधला तेच समाज टिकले, पराभवाच्या राखेतूनही पुन्ः
पुनः वर उठले. बाकीचे इतिहासजमा झाले.

आपल्यालाही असे इतिहासजमा व्हायचे नसेल तर हा सध्याचा
ढळलेला तोल लवकर सावरून घ्यायला हवा. खेडेगाव हा आपला,
भारतीय समाजाचा, किंबहुना सर्वच पौर्वात्य देशांचा तोलबिंदू आहे,
हे नीट ओळखायला हवे.

हा तोलबिंदू पकडता यावा या प्रेरणेतून झालेले हे सर्व लिखाण आहे.

१० जून १९७४      श्री. ग. माजगावकर


पुस्तकाची ही दुसरी आवृती.
काही बदल नाहीत.
शेवटी दिलेले पुस्तकावरचे
दोन विशेष अभिप्राय एवढी
काय ती नवीन भर.

श्री. ग. मा.


१ जून १९८३