पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
लेवा बांधवांना विनंती

फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरविणे हे लेवासमाजाला किती घातुक आहे, हे लेवासमाजातील प्रत्येक विचारी मनुष्याला माहीत आहे. असे समाजविघातक कार्य श्री. धनजी नाना चौधरी व त्यांच्या भोवतालचे तीन-चार इसम यांनी समाजाची मुळीच इच्छा नाही तरी जाणून बुजून हट्टाने व बेपरवाईने करण्याचे ठरविले आहे. या कार्यात लेवा समाजाची व इतरांची सहानुभूती मिळविण्याकरिता फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरविण्याचे बाबतीत लेवा समाजाची पूर्ण मदत आहे, असे हे लोक बेजबाबदारपणे जिकडे तिकडे खोटेच प्रसिद्ध करीत आहेत. या त्यांच्या प्रसिद्धी करण्यामुळे सर्वांचा गैरसमज होण्याचा फार संभव आहे. म्हणून आम्ही मुद्दाम प्रसिद्ध करीत आहोत की, लेवा समाज व विशेषतः लेवा समाजातील कोणीही सुशिक्षित व समंजस मनुष्य फैजपूर येथे काँग्रेस भरवावी या मताचा नाही. फैजपूर येथे काँग्रेस भरविण्याकरिता कोणी आपल्या जमिनी दिल्या असतील र त्यांनी अत्यंत अविचार केला असे म्हणावे लागेल. तरी त्यांनी व इतरांनी समाजाच्या हिताच्या दृष्टीने नीट धोरण ठेवावे. श्री. धनजी नाना चौधरी यांनी अंगिकारलेल्या समाजविघातक कार्याला कोणीही मदत करू नये; अशी आमची सर्वांना आग्रहाची विनंती आहे.

ता. २५-७-१९३६

आपले नम्र

के. के. पाटील चेअरमन म्यु.; एम. पी. चिरमाडे; आर. एल. पाटील म्यु. स्कूल बोर्डचे चेअरमन; डी. एन. भोळे, म्यु. मेंबर; एन. बी. चौधरी; के. एस. पाटील, जळगाव; जी. जी. पाटील, प्रोप्रायटर खानदेश आयुर्वेदिक फार्मसी, जळगाव; तुळशीराम शंकर महाजन; डॉ. आर. बी. पाटील; एस. बी. चौधरी, मे. महाआनंद प्रेस; व्ही. सी. नेहेते, संपादक, बातमीदार; बॅ. व्ही. एन. पाटील, एम. एल. सी., जळगाव; एस. के. राणे, बी. ए. एल. एल. बी. प्रेसिडेंट ता. लो. बो., डि. लो. बो. व स्कू. बो. मेंबर, जळगाव; एल. डी. पाटील, बी. ए. एल. एल. बी. प्रेसिडेंट ता. लो. बो. जळगाव ; एच. एस. पाटील, बी. ए. एल. एल. बी. वकील, जळगाव; बी. डी. इंगळे पेन्शनर

। ३७ ।