पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रास्ताविक


गेली दहा-बारा वर्षे ग्रामीण भागात मी खूप हिंडलोफिरलो.
विशेषतः जेथे नवनिर्माणाचे काही काम घडले, चळवळी झाल्या ते
भाग, तेथील बदल मी जवळून पाहिले. काही ठिकाणी थोडेफार
प्रत्यक्ष कामही केले. त्या त्या वेळी जसजशी मनःस्थिती होती
तसतसे काही लिखाणही केले. कधी अंतर्मुख होऊन. कधी बहिर्मुख
वृत्तीने. त्यामुळे काही लिखाण स्वैर, चिंतनात्मक तर काही लेखवजा
असे झाले. कधी मुलाखती घेतल्या, मित्रांशी पत्ररूप संवाद केले. या
सर्वांचा हा संग्रह आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेविषयी, एकूणच राष्ट्रीय नियोजनाविषयी काही नवे विचार-
मंथन देशात सुरू आहे; नसल्यास व्हायला तरी हवे आहे.
मला आपले वाटून गेले की, ही वेळ अशा स्वरूपाचा संग्रह
प्रकाशित करायला बरी आहे. नाहीतर इतकी वर्षे हाताशी स्वतःची
प्रकाशनसंस्था असूनही, मी हा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा विचार
कधी केलेला नव्हता.

आज शहरे वाढताहेत. ग्रामीण भागाचे अखंड, अहर्निश शोषण सुरू आहे.
अर्थव्यवस्थेचा समतोल यामुळे ढळला आहे. हे थांबले नाही