पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

the agricultural extension work itself reveals that nearly 70 percent of its benefits went to the elite group and to the more affluent and influential agriculturists. The gains to poorer agriculturists were considerably smaller. Being suspicious of government officials they did not seek help from the project as often. As this group had little influence in the village and outside, and was in no position to offer any material help in the furtherance of project objectives, the officials largely ignored it. For the economical development of this group, as well as for that of artisans and agricultural labourers, no programmes were initiated by the project' (P. 83)

'ग्रामीण समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उद्देशाने विकासयोजना अस्तित्वात आल्या. परंतु दोन खेड्यांतील या योजनांच्या पहाणीवरून असे दिसून आले की, योजनेपैकी फक्त शेतीविकासाचा कार्यक्रम बऱ्याच अंशी सफल झाला होता. परंतु शेतीविकास योजनांचा फायदा घेणाऱ्या शेतकरी समाजाचे अधिक निरीक्षण केल्यावर ही गोष्ट ध्यानात आली की, योजनेच्या फायद्यांपैकी जवळजळ सत्तर टक्के फायदे खेड्यांतील वरिष्ठ व श्रीमंत शेतकरी वर्गाच्याच वाट्यास आलेले होते. गरीब शेतकऱ्याला या योजनांपासून म्हणावा असा लाभ मुळीच झालेला नव्हता. सरकारी अधिकाऱ्यांविषयी गरीब शेतकरीवर्गाच्या मनात संशयाची भावना असल्याने विकासयोजनाधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी या वर्गातील माणसे सहसा जात नसत आणि या माणसांचे सामाजिक वजन कमी असल्याने व त्यांचे कडून योजनेच्या परिपूर्तीसाठी कोणतेच दृश्य-सहाय्य मिळण्याजोगे नसल्याने विकास योजनाधिकारीही या वर्गाकडे दुर्लक्ष करीत असत. लहान शेतकरी, कारागीरवर्ग, शेतमजूर या समाजांच्या आर्थिक विकासासाठी विकासयोजनेतर्फ कसलीही सोय करण्यात आलेली नव्हती.' (पृ. ८३)

प्रवृत्तीधर्माचे मार्ग

हा तपशील अद्यापही बराच वाढविता येईल. अनेक सरकारी अहवाल, एस्टिमेट्स कमिट्यांचे रिपोर्टस, तज्ज्ञांचे अभिप्राय यातून ही गोष्ट आता सर्वांच्यापुढे येऊन चुकलेली आहे. परंतु जनतेचे सहकार्य न मिळण्याचे हेच प्रमुख कारण आहे, ही गोष्ट मात्र व्हावी तेवढी स्पष्ट झालेली नाही. आपल्या योजनांची आखणी समाजवादी धर्तीची असेलही. पण प्रत्यक्ष फायदे जर अल्पसंख्य गटालाच मिळतात असा अनुभव असेल तर बहुसंख्य जनता योजनेच्या यशासाठी झटून सहकार्य करील ही

। ३२ ।