पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहाणीचा अहवाल सागर विद्यापीठाचे प्राध्यापक एस. सी. दुबे यांनी 'India 's changing villages' या नावाने १९५८ सालात प्रसिद्ध केलेला आहे. त्यातील सहकारी सोसायट्यांबद्दलचा पुढचा निष्कर्ष पाहण्याजोगा आहे. प्रा. दुबे लिहितात-

Notwithstanding the increase in the number of members and share capital, the co-operatives are still far from becoming a regular and vital part of the village people's life. A considerable section of the agriculturists views them as an official outside organization, as something alien to the village and not quite dependable. The membership is confined largely to persons of higher status and upper income groups, and positions of responsibility in them are occuppied mostly by village politicians. (P. 66)

'सहकारी संस्थाच्या शेअर भांडवलात व सभासदसंख्येत वाढ झाली असली तरी या संस्था आपल्या जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहेत या दृष्टीने ग्रामीण जनता त्यांच्याकडे पहात नाही. ही एक बाहेरची सरकारी यंत्रणा खेड्यांत आली आहे अशा परक्या दृष्टीने बराच मोठा शेतकरी वर्ग या संस्थांकडे पहात असतो व त्यामुळे या संस्थांवर फारसे विसंबून रहाण्याकडे त्याची प्रवृत्ती नसते. या संस्थांच्या सभासदात गावातील वरिष्ठ व श्रीमंत शेतकरीवर्गातील लोकांचाच भरणा विशेष असतो व अधिकाराच्या जागा बहुधा गावातील राजकारणी पुढाऱ्यांकडेच असतात.' (पृ. ६६) उत्तर प्रदेशातील खेड्यांच्या पहाणीचे हे निष्कर्ष आपल्याकडील परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडतात हे येथवरच्या विवेचनावरून कोणाच्याही ध्यानात येईल.

विकास-योजनेचा अनुभव

फैजपूरला विकासयोजना लागू नाही. परंतु विकासयोजनांचा अनुभवही सहकारी संस्थांपेक्षा फारसा वेगळा नाही. प्रा. दुबे यांचा यासंबंधीचा अभिप्राय पहाण्यासारखा आहे. वरील पुस्तकात एके ठिकाणी ते लिहितात-

'Although the ideal of the Community Development Project was to work for the many-sided development of the entire community, from the foregoing account of its work in two villages it is clear that its significant and best organized activities were confined to the field of agricultural extension and consequently the group of agriculturists benefited the most from them. A closer analysis of

। ३१ ।