Jump to content

पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकशाही मूल्यांवरचा हा विश्वास अभंग ठेवणे हीच या परिवर्तनाच्या संधिकालातील मुख्य गरज आहे. लोकशाहीचे सहकारीमार्ग आणि सत्तेपासून दूर असणाच्या विधायक कार्याचे तळ विद्यार्थी आणि अन्य लोक-संघटनाकडून बांधून घेणे याच मार्गांनी, भारतीय जीवनातील शक्ती आर्थिक आणि सामाजिक बदलासाठी एकवटल्या गेल्या पाहिजेत; पण या मार्गात अनेक अडसर आहेत. निष्ठेने अंग झाडून काम करण्याची आपल्यापैकी फार थोड्यांना सवय आहे. येथील नोकरशाही आणि राजकीय पक्षातील मोक्याच्या जागेवरची अधिकारी मंडळी केवळ भ्रष्ट आहेत, असे नाही. ती कणखरही नाहीत, कष्टाळूही नाही आणि हवी तेवढी कल्पकही नाहीत. आपली उभी सामाजिक आणि सांस्कृतिक रचना आणि नेतृत्वपरपरी अखंडपणे लोकशाहीचीच आहे आणि त्यामुळे लोकाहीवाचूनचे अन्य पर्याय या भूमीत रुजूच शकणार नाहीत, अशा भोळया-भाबड्या सांस्कृतिक अटळवादातही (Cultural Determinism) मश्गूल राहून भागणार नाही. आपली भारतीय सहिष्णुता ही खरोखरच जागरूक अन् विधायक आहे का ? 'जाऊ द्या हो' या पेंगत्या औदासिन्यालाच आपण 'लोकशाही सहिष्णुता' हे गोंडस नाव देतो का ? या प्रश्नाचा निर्णयही नजीकच्या काळात लागावयाचा आहे. आपल्या मध्यमवर्गातील काही जणांना केवळ अघोर निर्णयबुद्धीवर आधारलेल्या नीतिशून्य पण हिटलर जातीच्या समर्थ नेतृत्वाचे फार आकर्षण आहे. सरकार हेच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे एकमेव शस्त्र नाही, अन्य सामाजिक आणि सांसकृतिक लोकशाही संख्या यांना सरकारइतकेच या समाजजीवनाच्या कार्यात स्थान आहे याच भान मुळातच आपल्या बहुजनसमाजाला नाही. म्हणूनच मागासलेल्या देशांचे आधूनिकीकरण अणि आर्थिक विकास याचा अभ्यास करणारे लोकशाहीवादी समाजशास्त्रज्ञ नेहमी एक महत्त्वाचा अन गंभीर इषारा देत असतात तो हा की, चीन सोव्हिएट रशियातील एकपक्षीय राज्यसत्तांनी लोकशाही मार्गावाचूनही आर्थिक परिवर्तन करणे शक्य आहे हे एकदा दाखवून दिल्यापासून अविकसित देशातील बहुजनसमाजालाच नव्हे तर कित्येक सुजाण लोकांनाही सरकारी परिवर्तनाचा फार माह पडलेला आहे; पण यासारखा दुसरा धोकेबाज मोह नाही. परिवर्तनाच्या जबरदस्त अन् प्रचंड शासकीय शक्तीबद्दलचा आणि त्यामागच्या निघृण नेतृत्वाचा हा मोह अन् भय-आदरमिश्रित कुतूहल हे लहान मुलांना राक्षसाच्या शक्तीबद्दल वाटणाऱ्या मोह अन कुतूहलासारखे निरागस पण भयंकर आहे. ज्या परिवर्तनात स्वातंत्र्य आणि लोकशाही ही मूल्येच नाहीत, ते कोणत्याही अर्थाने परिवर्तन असूच शकत नाही. म्हणूनच मला आठवते, पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुमारे वर्षांपूर्वी सांगितले होते की, भारताच्या लोकशाही परिवर्तनाचा आर्थिक अन् सांस्कृतिक मार्ग हा चीनसारखा नाही. तो फार वेगळा अन् वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो एक फार लांबचा प्रवास आहे आणि एक चीनी म्हणच सांगून गेली आहे-Even the

। १९३ ।