पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/199

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे  ५. ग्रामीण भागातील खालच्या शेतकऱ्यांच्या गरीब थरांपर्यंत, Extension Servicse द्वारे शेतीतील अत्याधुनिक उत्पादनाचे शोध आणि तंत्र पोहोचविणे, हे चिनी कम्यून्सनी साधले आहे. आधुनिक यंत्रप्रधान आणि व्यापारीऔद्योगिकतेशी चिनी कम्यून्सनी फारकत घेतलेली नाही. 
४ :
  भारतातील सर्वागीण परिवर्तनाबद्दलच्या मार्गाची थोडीफार चर्चा आता केली पाहिजे.
  भारतातील सामाजिक बदल हे आर्थिक विकासाशी निगडित आहेत. पण या आर्थिक विकासाचा वेग तर मंद आहे आणि आर्थिक वाढीसाठी आवश्यक असणारा उत्पादनाचा रेटाही जबरदस्त नाही. भरीस भर म्हणून आपली राष्ट्रीय उत्पन्नाची विभाजनपद्धतीही विषम आणि सदोष असल्यामुळे आहे या विकासाची फळेही शहरात वरच्या वर्गाकडे आणि खेड्यांत सधन शेतकऱ्यांकडे रवाना होत आहेतआपल्या जात-पात-गट यांवर आधारलेल्या विषम समाजरचनेच्या चक्राचे दाते राजकारणातील सत्ता-रचनेच्या दात्यांत असे काही विचित्रपणे अडकले आहेत का त्यांतून राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या बदलांची एक प्रकारची गुदमरवून सोडणारी कोंडी निर्माण झाली आहे.
  ही कोंडी फोडण्याचा एकच मार्ग म्हणजे भारतीय जीवनातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक शक्ती एकवटणे हा होय. या शक्ती कोणत्या? या प्रश्नाला उत्तर देताना माजगाकरांना एकीकडे भूदानामधील समन्वयी सर्वात्मकता आणि त्यामागची 'दान' कल्पनेची सांस्कृतिक प्रतीकात्मकता आकर्षित करते. 'समाजातील अखेरच्या, तळच्या माणसाला स्पर्श करावा, तो वर उचलावा ही त्यामागील नैतिक प्रेरणा मला भिडते व अविरोधाच्या, सर्वात्मकतच्या भूमिकेवरून करण्यात आलेली या आंदोलनाची मांडणी माझ्या भारतीय मनाला जवळची वाटते'. ( पृ ४५-पोचमपल्लीकडे ) 'भूदान हे एक सग्रम आचारविचारदर्शन आहे. ( पृ ५९ ) तर त्याच वेळी दुसरीकडे ते विरोधाची आणि संघर्षाचा 'धारदार पाती' ही चालविण्याची भाषा करतात. ( पृ १३८ ) तसेच भूदानआंदोलनाला 'लढाऊ वळण' द्यायचे म्हणजे काय करायचे ?' क्रांतिकारक लोक शक्तीला नवा संघटित आकार ' कसा द्यायचाऱ्याचाही स्पष्ट उलगडा त्यांच्या लेखांतून नीटपणे होत नाही. ( पृ १३१-१३३-यती, ग्रामस्वराज्यकोश )पण मनाची म्हणा किंवा विचारांची म्हणा अशी ओढाताण त्यांच्या पुस्तकात क्वचित दिसली तरी विधिमंडळीय लोकशाही मूल्यांवर त्यांचा मुलभूत विश्वास आहे यात कसलीही शंका नाही.
              । १९२ ।