पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हुकमशाही पक्ष-सत्ता आहे हा नेहमीचा मुद्दा इथे सुचवावयाचा नाही. भारतातील ग्रामीण विकासाच्या मार्गात विषम समाज-रचनेचे सांस्कृतिक परंपरेचे आणि सत्तेच्या राजकारणातील सत्तेच्या खेळाचे जे अडसर आहेत आणि ज्यामुळे आर्थिक सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय, अशा अलग-अलग दऱ्या इथे पडतात, तशा पडण्याची शक्यताच एकपक्षीय सत्तेमुळे नाहीशा होतात. हा फरक महत्त्वाचा आहे असे इथे म्हणावयाचे आहे.

 २. स्वयंशासन आणि गावच्या जमिनीवरची समाईक मालकी याबाबत ग्रामस्वराज्य आणि गतकाळातील आणि आजच्या चिनी कम्युनिस्ट कम्यून्स यांत एक नाववाद साम्य आहे असे माजगावकरांनी सावेश म्हटले आहे. (पॅरिस आणि पुणे ७९-८७,' कम्यन्स आणि ग्रामराज्ये पु. ८८-८९, ९१ ) मला हे म्हणणे चूक वाटते. एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या आणि एकाच पक्षाकडून प्रस्थापित होणाऱ्या सर्वकष अशा राजकीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनपद्धतीचे एक साधन म्हणून कम्युनिस्ट कम्यून्सचा वापर होतो. गांधी-विनोबांच्या ग्रामस्वराज्यापाल स्वयंशासनामागे व्यक्तिस्वातंत्र्य हे नैतिक मूल्य आहे. कम्यून्ससध्ये हे मूल्य नाही. स्वयशासनाची प्रेरणा इस्राइलच्या किबुत्झमध्ये आहे. तसेच अमेरिकेतील Counter Culture चळवळीमधील तात्पुरत्या स्थापन झालेल्या हिप्पी–कम्यून्स मध्येही ती होती.

 ३. चिनी अर्थव्यवस्थेत माणसाच्या मलभत गरजांची-अन्न, वस्त्र, निवारा-सवे चात सर्वसाधारणपणे एक किमान आवश्यक अशी समान पातळी राखली गेली जह असे एक मत प्रचलित आहे. गॅलब्रेथसारख्या प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनीही त्याची ग्वाही दिली आहे, पण आज ना उद्या याचा असा अर्थ होईल की माओचा साम्यवाद हे समृद्धीचे तत्त्वज्ञानच नाही. अगदी गरजेपुरत्या उपभोगालाच म्हणजे गरिबीच्या थोड्याफार वरच्या राहणीलाच त्या तत्त्वज्ञानात मान्यता आहे अस काही वळण माओ विचारांना लागेल तरच किमान साध्या गरजांच्या आणि या राहणीच्या तत्त्वज्ञानावर आधारलेल्या ग्राम-स्वराज्य आणि चिनी कम्युन्स यांत साम्य आहे असे आपल्याला म्हणता येईल.

 ४. साधी रहाणी वगैरेसारख्या भारतीय नैतिक प्रेरणेपेक्षाही बहुजन समाजाच्या गरिबीत बाकीच्या वर्गांनीही श्रममूल्यांची महती मान्य करून प्रत्यक्ष सहवासाने समरसून गेले पाहिजे, ही प्रेरणा चिनी अर्थजीवनात जास्त आहे. सोव्हिएट अवपद्धती आणि जीवनपद्धती चैनी उपभोगावर आधारलेल्या पाश्चिमात्य भांडवलशाही पद्धतीजवळ जात आहे, चिनी साम्यवाद ही मात्र शुद्ध समाजवादी प्रेरणा आहे असा युक्तिवाद यामागे आहे.

। १९१ ।