पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘एक वेळ भूकबळी होऊ पण हे भीकबळी होणे नाही.' 'करू पुन्हा एकदा परदेशी वस्तूंची होळी - निदान त्या दूधभुकट्यांची नाही तर अमेरिकन गव्हाची तरी !' 'या गर्वगीतांच्या आणि स्फूर्तीमंत्रांच्या सामगायनांसाठी, मित्रांनो, चला कैलास ते सिंधुसागर !' ही त्याची बोलकी उदाहरणे. ती वाचून, परदेशी सत्ता किवा दुसऱ्या दृश्य शत्रूचे लक्ष आज नसताना, ही सावरकरी अन् कुसुमाग्रजी छटा असलेली लढाऊ भाषा अन् प्रतीके कशाला ? असा प्रश्न एखाद्या वस्तुनिष्ठ ठेवणाीच्या वाचकाच्या मनात येईलही; पण माजगावकर हे कार्यकर्ते पत्रकार आहेत. कोणताही पत्रकार हा प्रचारकच असतो. यात्रेची भिरभिरती भिगरी त्यांनी अन्नस्वतंत्रता संचलनासाठी ( आणि एरवीसुद्धा! ) आपल्या पायांना लावली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील युद्धमान संस्कारांमुळे तत्कालीन प्रतिमा अन् रूपके त्यांच्या मनात खोलवर गेली आहेत; आणि एखादा समाजवादी प्रचारक आपल्या प्रचारात आपली ब्रीदाची प्रतीके वापरल्यावाचून राहील काय ? अशी उत्तरे त्याला सहज देता येतील. मी स्वतः त्याच काळातील असल्यामळे आणि त्या प्रतीकांची असोशी मलाही माहीत असल्यामुळे माजगावकरांच्या लेखणीचे रूप मी समजावून घेऊ शकतो.

 पण हा प्रश्न गैरलागू आहे. मुख्य मुद्दा आहे तो हा- 'रक्त, अश्रू आणि घाम याशिवाय गरिबी हटवण्याचा दुसरा पर्याय नाही,' या प्रेरणेला एखाद्या देशाच्या अर्थ-विकासात काय स्थान आहे ? या बाबतीत, 'आपले धान्यही न उपादणाच्या देशास कल्पना-विचार–साहित्य प्रांतात म्हणण्यासारखे काही निमिता येईल, असं हाला खरच वाटतं ?' -ह्या प्रश्नाला पाठिंबा देण्याइतका जो टीपेचा कर्कश सूर माजगावरकर कधीकधी लावतात तो मला मान्य नाही. कोणतीही अर्थ-व्यवस्था मग ती भांडवलशाही असो, समाजवादी असो किंवा संमिश्र असो-हवी तशी, वाचकपणे वाकवण्याचे Manuevre करण्याचे अर्थशास्त्रीय कौशल्य आणि प्रतिभा ही स्वावलंबनाइतकीच महत्त्वाची आहे, असेही मला वाटते, पण हे मत सांगून माजगावकरांचे स्वावलंबनाचे एकतारीवरील ध्रूपद मला महत्त्वाचे वाटते.

(म्हणूनच 'अठरा लक्ष पावलां'च्या त्यांच्या अन्नस्वतंत्रता-संचलनात मीही माझी दोनतीन पावले टाकली होती ! ) |

 महत्त्वाचे, आजच्या काही विशिष्ट संदर्भात. पुस्तकी अर्थशास्त्रातले जागतिक थिक जीवन, व्यापार आणि देवघेवीचे सिद्धांत वाचून दाखवून आर्थिक क्षेत्रातील वातंत्र्य ही कल्पना कशी अशास्त्रीय आहे, हे साधार पटवून देणे शक्य आहे. त्याचप्रमाणे आपली लोकसंख्या, विराट गरिबी आणि खचलेली निर्वाहपातळी याबइलचे दांडेकर-रथांच्या पुस्तकातले डोळे फिरविणारेच आकडे त्यांच्यासमोर आपटून, ‘अन्नधान्याच्या सार्वभौमत्वाबद्दल साक्षात्कार,' प्रचीतीचा पुरुषार्थ वगैरे

। १८५ ।