पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकवटून काम करावयास हवे. 'संपूर्ण रेल्वेलाइन गेलेल्या कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गाव वेगळा. जावळीसारख्या दऱ्याखोऱ्यांत किंवा झाडाझुडपांत दडलेला तालुका वेगळा. फलटणसारख्या संस्थानिक वातावरणात वाढलेल्या तालुक्याची प्रकृती वेगळी. माणसारख्या धनगरांची फिरती वस्ती असलेल्या तालुक्याचे स्वरूप वेगळे-' सामाजिक आणि प्रादेशिक भिन्नतेची अशी उदाहरणे देऊन या प्रश्न भिन्नतेनुसार आपले विकासप्रकल्प आखले जायला नकोत का ? असा महत्त्वाच. ते विचारतात. इतकेच नव्हे तर प्रत्येक गावच्या जमिनीचा प्रश्नसुद्धा वेगवेगळा असतो, हा एका समाजवादी कार्यकत्र्याचा दृष्टिकोन ते या संदर्भात आपल्या समोर आवर्जून ठेवतात. 'वेडपट' आणि 'चक्रम' ही संभावना आयुष्यभर सहन केलेल्या एस. आर. भागवतांच्या, डोंगरावरून वाहणारे पाणी जमिनीत मुरवण्याच्या कल्पक योजनेचा पुरस्कार आणि माणूस प्रतिष्ठान'ने सुरू केलेल्या सुप्याच्या विहिरीच्या प्रयोगाची मनमोकळी चर्चाऱ्या दोहोंतूनही माजगावकरांची तीच प्रांजल विधायकदृष्टी दिसून येते.

: २ :

 लोकशाही नियोजनाच्या द्वारे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे आपले प्रयोग कोसळत गेले हे एकदा मान्य केल्यावर, आपल्याला अपरिहार्यपणे काही नैतिक प्रेरणा आणि सांस्कृतिक मूल्ये आणि परंपरा यांचा विचार करणे भागच पडते. कारण भांडवलशाही किंवा ‘प्रस्थापित' अर्थ आणि समाजव्यवस्था ही आपल्या अध:पतित चारित्र्याला जबाबदार आहे, ही नेहमीची लोकप्रिय मीमांसा एकतर्फीही आहे आणि सोपीही आहे. समजा, सोव्हिएट रशिया किंवा चीनसदृश समाजवादी रचना हे ध्येय मानले, तरी ती उभारण्याइतके सामथ्य आपल्या सामाजिक–सांस्कृतिक परंपरेत, मूल्य-सृष्टीत आणि नैतिक प्रेरणांत आहे काय ? या प्रश्नालाही आपल्याला थेट भिडावेच लागते.

 माजगावकरांनी आपल्यापरीने या प्रश्नाचा बरोबर मागोवा घेतला आहे, असे मला वाटते.

 ज्या नैतिक प्रेरणांचा माजगावकर वारंवार उदघोष करतात, त्यातील पहिला आणि महत्त्वाची, म्हणजे शेती व अन्नधान्य या दोन क्षेत्रांत आपण पूर्णपणे स्वतंत्र आणि कठोरपणे स्वावलंबी असले पाहिजे हा; 'उद्घोष' असा शब्द इथे वापरला आहे, तो हेतूपूर्वकचे; कारण 'श्रीग्रामायन' मधील 'चला,' 'वल्होळी-जिल्हा नाशिक' 'अन्न परावलंबनानंतर कृषि–परावलंबन' हे लेख आणि त्यातील अभिव्यक्ती ही प्रधानतः एक प्रकारच्या घोषाच्या स्वरूपाची आहे.

। १८४ ।