पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या चार घटकांचा या परीक्षणात क्रमाक्रमाने विचार करावयाचा आहे.

: १ :

 आजच्या ग्रामीण भारतात बदल घडवू पाहणाऱ्या काही संस्था, प्रयोग आणि विविध सुधारणा या सर्वांवर माजगावकरांनी जागोजागी टीका केली आहे. समूहविकासयोजनात आणि एकूणच आपल्या आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमात खेडेगावचे लोक सहभागी होत नाहीत. ती उत्सुकताच त्यांच्या अंगी नाही. ( एका गावची स्वातंत्र्यकाळातील वाटचाल ) सहकारी पतपेढ्या, ग्राहक-संस्था आणि शेतीच्या विकासयोजनांचे जवळजवळ ७० टक्के फायदे वरिष्ठ व सधन शेतकरीवर्गालाच मिळत आलेले आहेत. आपला बहुसंख्य शेतकरीवर्ग म्हणजे २-५ एकर जमिनीचा गरीब मालक किंवा कुळऱ्या सत्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्या समाजरचनेतील आर्थिक विषमतेची दरी, स्वातंत्र्योत्तर काळात किती रुंदावत चालली जाह इकडही ते आपले लक्ष वेधतात. या संदर्भात, १९३६ च्या फैजपूर काँग्रेसला विरोध करणारे लेवा समाजातील नेते आज पंचवीस वर्षांनंतरही पुन्हा राजकीय आणि आर्थिक सत्तास्थाने कशी बळकावून बसले आहेत याचेही एक शेलके चित्र ते उभे करतात. (एका गावची स्वातंत्र्यकाळातील वाटचाल ) नवे कसदार स्थानिक नेतृत्व विकेंद्रीकरणामुळे पुढे येईल ही अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाही. राजस्थान, आंध्र, महाराष्ट्र यांमधील पंचायतसमित्यांतून कार्यवाहीत आलेले विके करणाचे प्रयोग फसलेले आहेत. सरकारी यंत्रणेतील नोकरशाही आणि ग्रामीण जनता यात जवळकीचे दुवेच नाहीत. (प्रगतीचा रस्ता ‘ब्लॉक' करणार तो 'ब्लॉकऑफिसर' ही थट्टा गावकरी मंडळींपर्यंतही पोचलेली आहे !) 'जनतेच्या पाठबळाशिवाय योजना यशस्वी होत नाही हे एकदा ध्यानात आल्यावर हे पाठबळ मिळविण्याची इतक्या वर्षात आपण काय सोय केली ?' असाही सवाल यासंदर्भात माजगावकर विचारतात. ('लोकशाही विकेंद्रीकरण-एक विचार’ आणि ‘पोचमपल्लीकडे')

 माजगावकरांची ही टीका सामान्यपणे खरी आहे. त्यांच्या सवालांना सरकारतफ चोख जबाबही देता येणार नाहीत. तशी ही टीका नवीन नाही. या विषयातील जाणकरालाच नव्हे तर सर्वसाधारण खेडेगावातील आजचे सामाजचित्र पाहणाऱ्या सामान्य नागरिकालासुद्धा आपल्या नियोजनाचे अयशस्वी स्वरूप पूर्णपणे ओळखीचे आहे. तथापी या टीकेपेक्षाही उल्लेखनीय आहे ती माजगावकरांची विधायक दृष्टी. 'सरकारने शिक्षणापासून दूर रहावे अन सगळ्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी गावाने घ्यावी' यासारखी एखादी अव्यवहारी सूचना सोडली तर विचार करावा असेही पर्याय ते काही काही वेळेला सुचवतात. उदा. खेडेगावातील साक्षरता आणि लोकशिक्षण या कार्यक्रमांत शिक्षणखाते आणि महसूलखाते

। १८३ ।