पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. आपण शांतिनिकेतनचे विद्यार्थी. ग्रामीण जनतेविषयी आपल्याला सहानुभूती असणार, गुरुदेवांच्या संस्कारांचा काही भाग आपल्यात अद्यापी शिल्लक असेल अशी मी आशा करतो. या लहानशा रस्त्यात किती राजकारण आडवे येत आहे ! लोक आता आश्वासनांना कंटाळले आहेत. रस्ते नाहीत म्हणून हा भाग चोरदरोडेखोरांचे लपण्याचे एक हमखास ठिकाण होऊन बसलेला आहे. पोलिसांना बंदोबस्ताचे काम नोट करता येत नाही. परवाच आपल्या शेतात चोरांना लपण्यास मज्जाव केला म्हणून येथे भरदिवसा एका शेतकऱ्याचा गोळी घालून खून करण्यात आला.

स्थानिक आमदार श्री. सत्यवीर (म्हैसूरचे राज्यपाल श्री. धर्मवीर यांचे बंधू ) याची संभावना अशी करण्यात आली : महाशय, तुमचे काळे तोंड घेऊन इकडे मत मागायला पुन्हा फिरकूसुद्धा नका. चिडलेले लोक दगडधोंडे मारून ते अधिकच कुरूप करून टाकतील.

हा रस्ता मात्र पूर्ण झाल्याचे पहाणे संपादकाच्या भाग्यात लिहिले होते. त्याची ती जुनी, मोडकी तोडकी सायकल या रस्त्यावरून थोडी अधिक वेगाने, थोडी कमी त्रासात आता पळू शकत होती. गरज पडली तर रात्री बेरात्री बिजनौर-हल्दौरपर्यंत चकरा मारणे त्याला आता थोडे सुलभ झाले होते.

पण किती काळ ही यातायात, ही तडफड चालू शकत होती ? मूळ शरीरप्रकृती दणकट असली तरी पन्नाशी जवळ आली होती. पायात कधी याने वहाण चढवली नाही. कमरेला फक्त एक पंचा. सुरुवातीला भगवा, नंतर पांढरा. खांद्यावर वस्त्र आहे आहे, नाही नाही.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उघड्या माळावर हा असा उघड्या अंगाने, अनवाणी पायाने वावरत होता, राबत होता.

कदाचित यामुळे असेल, याच्या डोळ्याला थोडी इजा पोचली. एक डोळा लहानपणापासूनच अधू होता. दुसराही त्रास देऊ लागला. पत्रव्यवहातून स्नेह जमलेल्या एका स्त्री डॉक्टरने लुधियानाला याला बळेबळे हालविले आणि तेथील सुसज्ज मिशन हस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरकडून याच्या डोक्यावर तिने इलाज करवून घेतला. या हस्पिटलमध्ये हा फक्त दोन की तीनच दिवस होता. पण तेथील मुख्य परिचारिका नीट शाम करीत नाही, रुग्णांशी उर्मटपणे वागते म्हणून हा तडकला. परतल्यावर अंकातून ने या नर्सचा उद्धार सुरू केला. शेवटी हॉस्पिटलच्या चालकांना याला कळवावे गिल की बाबारे, या नर्सला मुदतपूर्व पेन्शनीत काढण्याचा आमचा विचार चालू झाला आहे.

असे घाव घालीत, वार झेलीत गोविंदपूरच्या कुग्रामातून स्वामिजी दिल्लीची सत्ताबदलण्याची स्वप्ने पहात होते. जेथे महाभारत घडले ती कुरुक्षेत्राची भूमी जवळच होती. पण ‘दोन सैन्यांमध्ये, अच्युता, माझा रथ नेऊन उभा कर' ही स्वामिजींची

। १६९ ।