पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the affairs of the simple folk who sweat and toil in the fields along with me, But I will play best my role as a writer whose honest duty is to expose and expose; dare, dare and still more dare as Dantan has said.'

गोविंदपूर. बिजनौरपासून सहा सात मैलावरचे एक वसती नसलेले गाव. उत्तर प्रदेशात अशी बरीच गावे आहेत. फक्त कागदोपत्री नोंद असलेली. ग्रामपंचायत खारी. केंद्र सुरू झाले. पण क्रांतीसैनिक आणि संस्थाचालक ही जोड प्रथमपासूनच नीट जमेना. लढा संघटित करण्याची भूमिका पत्करावी तर विधायक उभारणीच्या कार्याला खीळ बसू लागली. दहा बारा एकर जमीन एकाने दान दिलेली होती. ही पिकवावी, फुलवावी, आश्रम वाढवावा, टागोरांच्या शांतिनिकेतनसारखे काही भव्य रूप याला प्राप्त करून द्यावे ही सुरुवातीची कल्पना. पण हे साधायचे तर प्रस्थापिताशी उभा दावा धरण्याच्या भूमिकेला अनेक ठिकाणी मुरड घालणे आवश्यक होऊन बसते. अनेक तडजोडी पत्कराव्या लागतात, अन्याय गिळावे लागतात, संघर्षाची धार बोथट होऊ द्यावी लागते. एखादा गांधीच ही दुहेरी किमया साध शकतो. विधायक कार्याचा पसारा सुटसुटीत, लोकाधारित व आटोपशीर ठेवून एकीकडे गांधी संस्था उभारीत होते. चळवळींचा जोर वाढताच संस्था मोडल्या, सरकारी वरवंटा त्यांच्यावरून फिरला तरी गांधींना त्याची फारशी पर्वा वाटत नव्हती. गोविंदपूरला मात्र संघर्षाची धार जसजशी तिखट होत गेली तसतसे केंद्र उभारणीचे कार्य मागे पडत गेले. विहीर झाली तर पंप बसेना ; पंप बसला तर वीज मिळेना. पावलापावलाला अडचणी, अडथळे, विरोध, तंटे आणि तक्रारी. एक पैची लाच देणार नाही ही संपादकाची प्रतिज्ञा. आश्रमाची साधी साधी कामे सरकारी फितीत यामुळे अडखळू लागली. हा हटत नसे. कागद पुढे सरकत नसे. शांतिनिकेतन असे करून कसे उभे राहणार ? महर्षी कर्वे यांनी ही काटेरी वाट टाळली म्हणून तर विद्यापीठ उभे राहू शकले; पण याने ठरवले असावे, काटे तुडवायचे. रक्तबंबाळ व्हायचे. संस्थांचे मजले चढविण्याऐवजी कुरुक्षेत्रावरचा एखादा मोर्चा लढवायचा. हाच आपला स्वधर्म. केंद्र वाढले तर वाढले. नाहीतर गंगार्पण.

अर्थातच केंद्र वाढले नाही. जेमतेम एक विहीर तयार झाली. शिसम आणि आंब्याची थोडी झाडे, डिडोनियाचे कुंपण, बोगनवेली, गुलमोहोर, रातराणीचा सुगंध, उसाचा किरकोळ तुकडा, थोडेफार धान्य यावर समाधान मानून घ्यावे लागले. तीन झोपड्या ही स्थावर मिळकत. एका झोपडीत टेबलखुर्ची, पुस्तकाचे कपाट, कागदपत्रांचे शेल्फ, ते सायक्लोस्टाइल यंत्र. हीच संपादकीय कचेरी, रहाण्याजेवण्याची, झोपण्याची जागा. दुसरी झोपडी आल्यागेलेल्यांसाठी असावी आणि तिस-

। १४९।