पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येथे गंगाकिनारी पापक्षालन करावे यासाठी मी काही आलेलो नाही. गंगेत डुबकी घेऊन बुडवावे--धुवून काढावे असे कोणतेही पाप मला आजवर शिवलेले नाही गेली वीस-पंचवीस वर्षे आपल्या समाजाचा तळ गाठण्यासाठी, तेथून क्रांतीचा उठाव करण्यासाठी मी जिवाची कुरवंडी चालवलेली आहे. ग्रामीणतेशी माझे नाते जडलेले आहे. आम्ही विनोबांची माणसं आहोत. ग्रामीण जनतेच्या, सर्वात खालच्या पातळीवर जीवन जगणाच्या मानवतेच्या सुखदुःखाशी समरस होणे, ही पातळी उंचावण्यासाठी जगणे आणि झगडणे हा आमचा धर्म आहे. या रहाणीत अनंत अडचणी आहेत. सुखसोयी नाहीत. पदोपदी सरकारी यंत्रणा व तिचे गावातील भ्रष्ट दलाल छळतात, आडवे येत रहातात. तरीही आम्ही हा खंदक सोडून पळून जात नाही. भारतीय जनक्रांतीची लढाई या खंदकातून लढली जाणार आहे. आम्ही कदाचित ही लढाई पहायला, खेळायला असू किंवा नसू. पण पूर्वतयारीचे, अग्रदूतत्वाचे आमचे भाग्य तरी कुणी हिरावून घेवू शकणार नाही. आमचा अभ्यास, आमचे संशोधन, आमची सेवा ही सारी एका महान क्रांतीची पूर्वतयारी आहे असा आमचा विश्वास आहे.

कोण म्हणतो क्रांती बंदुकीच्या नळीतून जन्म घेते ? विचार ही खरी शक्ती आहे. शहरी सुखासीनतेत लोळत, पडल्यापडल्या, खुर्चीत बसून केलेल्या चितनमननातून किंवा चर्चा परिसंवादातून ही शक्ती जागृत होऊ शकते, यावर मात्र माझा मुळीच विश्वास नाही. यासाठी जनतेबरोबर राहिले पाहिजे. तिच्या सुखदुःखाशी, हालअपेष्टांशी समरसून कार्य केले पाहिजे. यासाठी तर आम्ही येथे आहोत. येथूनच खऱ्या, उदयोन्मुख भारताचे हृदय आम्ही जाणून घेत राहू, आपल्याला याहृदयाचे ठोके ऐकविण्याचा निकराचा प्रयत्न करीत राहू.

आपण कुठे उभे आहात ? आपल्या अंगावरचा भारी कोट विकून आपण नवे विचार, ताजे विचार जाणून घ्यायला उत्सुक आहात काय ? मग हे पाक्षिक आपले आहे. पण अपण डोके गहाण ठेवून, नवे नवे किमती कोट अंगावर चढविण्याच्या तुच्छ स्पर्धेत मश्गुल रहाणारे असाल तर हे बरे, की आपण आताच एकमेकांचा निरोप घेऊ. तुमचा प्रवास वेगळा आहे. आम्ही वेगळ्या मार्गावरचे प्रवासी आहोत. हो, उगाच भीडभाड, गोलमाल सभ्य भाषा आपल्या स्वभावात नाही. आपण स्वच्छ सांगून टाकणार- 'राजा ! तू भिकारी आहेस.' त्या गोष्टीतल्या लहान मुलासारखे आपल्याला एकदम ओरडावेसे वाटणार, Oh! the King is naked.

It might offend those who, sitting at the towns as worshippers of Mammon, meticulously ape the Western ways and misgovern

। १४८ ।