पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपण संध्याकाळी वेल्ह्यात पोचलो. तिसरे दिवशी सकाळी आपण तोरणा गडावर होतो. या वेळी थेट सिंहगडच्या पायथ्याला उतरलो. तिथेच एक वाटाड्या भेटला. प्रवाश्यांना सिंहगड दाखविण्याचे काम तो नेहमी करीत असतो. तिथल्याच अतकरवाडीचा. तो बरोबर यायला तयार झाला. निम्मा डोंगर या वाटेने चढावा लागतो. मेटावर पोचले की पश्चिमेकडे वळायचे. तशीच आणखी दोन मेटे लागली. उजव्या हाताला खानापूर. आपलं गोर्हं सगळं वरून दिसत होतं. ' मी.
'उतरलात तेव्हा गाव कोणतं लागलं ?' पवार.
'विझरच्या पुढचं दापोडं. तिथून चार मैल सरळ गाडीरस्त्याने वेल्हे.' मी.
'म्हणजे डोंगरावरून सगळी चाल झाली.'
' होय. पण त्रास काही झाला नाही. मागच्या ट्रिपची सारखी आठवण येत होती.'
'त्या वेळची गोष्ट वेगळी होती. बरं, तिकडचं पीकपाणी ? एका पावसाने पार दडी दिली आहे आमच्याकडे...' पवार.
'वाचलं खरं परवा वर्तमानपत्रात. मुळशी भागातील शेतकऱ्यांनी मामलेदार कचेरीवर एक मोर्चा नेला होता तो. तुम्ही होतात का त्यात ? ' मी.
'नाही. आता सगळं सोडून दिलं ते. पाच वर्ष पंचायतीचे काम केलं. भानगडीच फार. एक व्यवहार सरळ नाही. आपल्याला ते काही मानवलं नाही.'
'आता गावात निवडणकीची तयारी सुरू असेल ?'
'पाच वर्षात कुणी फिरकले नाही गावाकडे. गावकरीही आता तयार आहेत. टाक इतके पैसे देवळाला नाही तर शाळेला. नाहीतर फुट -हो, सरळ सौदा'
'दिल्लीवाल्यांच्या नावाने आपण उगाच ओरडायचे. गावात आपणही दुसरे काय करतो आहोत ? ' मी.
'खरं आहे' म्हणून पवार हसले. आणखी दोन-चार वाक्ये बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

'कशाला कोण येतय इथं मरायला. गांडुळे खाऊन जगणारी आम्ही माणसं ... '
सिंहगडच्या पश्चिम उतारावरील कळकीच्या मेटावर विसाव्यासाठी बसलो असता ती म्हातारी चटकन बोलून गेली.

मी सहज आधी गंमतीने म्हटलं होतं, 'काय भावाला चहापाणी वगैरे केलं की नाही?' माझ्याबरोबर आलेल्या अतकरवाडीच्या वाटाड्याची म्हातारी बहीण

। ११६ ।