पान:शेती-पशुपालन.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेती-पशुपालन - इयत्ता : ८ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिक : (अ) जमीन तयार करणे, जमीन तयार करणे म्हणजे ती भुसभुशीत करणे, पिकांच्या लागवडी योग्य करणे होय. एखादे पीक योग्य पद्धतीने लागवड करून उत्पादन घेण्यासाठी जमिनीची पिकाच्या गरजेनुसार योग्य ती मशागत करावी लागते यालाच 'पीक लागवडीपूर्वीची मशागत' म्हणतात. प्रात्यक्षिक : जमीन तयार करणे व बीजप्रक्रिया करून लागवड करणे. प्रस्तावना : जमीन व माती या दोन्हीमध्ये फरक आहे. जमिनीची वाहतूक करता येत नाही, तर मातीची वाहतूक करता येते. जमिनीत मातीचे प्रमाण ४५%, हवा २५%, पाणी २५% व सेंद्रिय पदार्थ ५% असल्यास ती पिकांच्या वाढीसाठी अत्यंत योग्य मानली जाते. यामुळेच पिकाचे उत्पन्न चांगल्याप्रकारे मिळते. विशेष माहिती माती कशी बनते? दगड, गोटे, वाळू, बारीक माती तसेच कार्बनी पदार्थ मिळून माती बनलेली असते. जमीन खणल्यानंतर मातीचे थर संपले की त्याखाली खडक लागतात. नदी, पावसाचे पाणी, वाहणारे वारे आणि हवामानात सतत होणारे बदल यांमुळे खडक आणि शिलाखंड फुटतात, झीज होऊन कालांतराने त्यांचे बारीक कणांमध्ये रूपांतर होते आणि त्याची माती होते. खडकांचे मातीत रूपांतर होणे, या क्रियेला खडकांचे अपक्षीणन म्हणतात. * सुपीक जमिनीला २.५ सेंमी. जाडीचा मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास ८०० ते १००० वर्षे लागतात. जमिनीतील युमस निर्मिती : माती हे सूक्ष्मजीवांचे आगर आहे. विविध प्रकारचे असंख्य सूक्ष्मजीव मातीत आढळून येतात. मातीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मिसळले, की तिच्यातील सूक्ष्मजीव या अवशेषांचे अपघटन घडवून आणतात. त्यातून नायट्रोजनयुक्त संयुगांची निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता वाढते. वनस्पती आणि प्राणी अवशेषांच्या अपघटनातून तयार झालेल्या मातीला कुपित मृदा (युमस) म्हणतात. जमिनीचे / मातीचे महत्त्व : (१) माती वनस्पतींना आधार देते. (२) वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध खनिजे, अन्नद्रव्ये मातीतून मिळतात. (३) वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पाणी माती साठवून ठेवते. (४) माती वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध सुक्ष्मजीवांचेही घर असते. भारत देश हा भौगोलिकदृष्ट्या वेगळा विविध असल्याने प्रत्येक भागातील/ प्रदेशातील जमीन ही वेगवेगळ्या प्रकारची आढळते. जमिनीचे सुपीकतेनुसार प्रकार: (१) गाळाची मृदा (२) तांबडी मृदा (३) काळी / रेगुर मृदा (४) वालुकामय मृदा (५) जांभी मृदा (६) खडकाळ मृदा इ. जमिनीचे प्रकार आहेत.