पान:शेती-पशुपालन.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अ) पाचर कलम: (१) आकृतीप्रमाणे एक ते दीड वर्षाच्या गावरान आंब्याचा शेंड्याकडील भाग सी कटरच्या साहाय्याने कापा. (२) कापलेल्या खोडाला मध्यभागी उभा काप घ्या. (३) चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापा. (४) फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाका. (५) फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचरीचा आकार द्या. (६) ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवा, (७) पूर्ण जोडप्लॅस्टिक पट्टीने बांधून टाका, इ) डोळा भरणे:(१) कलमासाठी निवडलेला डोळा फांदीपासून वेगळा करण्यासाठी चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडेने वर्तुळ पाकळीच्या आकाराचा काप घ्या. (२) फुटव्याला इजा न होता डोळा फांदीपासून वेगळा करा. (३) पाचर कलमाच्या ज्या फांदीवर तो डोळा बसवायचा आहे त्यावर इंग्रजी आय किंवा टी आकाराचा कापघ्या. (४) कापाच्या मध्यभागाची साल चाकूच्या साहाय्याने उचकटून काढलेला डोळा त्यामध्ये बसवा. (५) डोळ्यातील फुटवा उघडा ठेवून कलमावर प्लॅस्टिक पट्टी ताणून बांधा. दक्षता: (१) कलमाचे काम करताना सी कटरने/चाकूने शरीराला इजा होणार नाही याची काळजी घ्या. (२) छाट/पाचर कलमांसाठी फांदी निवडताना कोवळी अथवा फार जुनी फांदी निवडू नका. (३) पाचर कलमाच्या त्या फांदीवरती किमान चार डोळे आहेत याची खात्री करा, गुटी कलमाला मुळ्या फुटल्यावर ती गुटी मूळ झाडापासून वेगळी करा. (५) पाचर कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फूट आल्यास ती काढून टाका. (६) डोळा भरणे कलम केल्यानंतर मूळ झाडास नवीन फूट आल्यास ती काढून टाका. (७) कलमांसाठीच्या फांद्यावरती कोणत्याही प्रकारची कीड नसावी. आपणांस हे माहीत आहे का? (१) वनस्पती प्रजननाच्या दोन पद्धती आहेत. (अ)लैंगिक (बी पासून रोपे) (ब) शाकीय (खोड, फांदी, पान, मूळ इ. पासून रोपे) कॅरोडेक्स पावडर एक संजीवक म्हणून वापरतात. त्यामुळे मुळे फुटण्यास मदत होते. (३) स्पॅगनम मॉस हे एक शेवाळ आहे. ते पाण्यात भिजवून लावल्यामुळे त्या ठिकाणी ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. छाट कलमात, गुट्टी कलम, कोय कलम इ. निवडतात फांदी एक सेंटिमीटर व्यासाची असावी. तयार झालेल्या कलम रोपांची पुर्नलागवड करा. (६) जवळील नर्सरी केंद्राला भेट देऊन कलम बांधणीचे निरीक्षण करा व कलम बांधणीचा सराव करा. ४२