पान:शेती-पशुपालन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अ) फवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी(१) आपण वापरणा आहोत तो पंप ज्या पिकावर फवारणी करणार त्यासाठी योग्य की अयोग्य हे माहिती पत्रकावरून समजावून घ्यावी. (२) पंपाच्या सर्व भागांची पाहणी - हलणारे भाग आवळून घेणे, आवश्यक त्या ठिकाणी वंगण लावावे. (३) पेट्रोलवर चालणारे पंप ऑईल व पेट्रोल मिश्रण पाहावे. (४) फवारणी चाचणी- पिकांनुसार नोझलची निवड करावी. फवारणीचे एकूण क्षेत्र फवारणीचे औषध तयार करायचे. द्रावण, फवारणीसाठी किती वेगाने चालावे लागणार हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत. (५) स्वच्छ पाणी वापरणे. औषध मिश्रण गाळून टाकीत टाकावे. आकृती ब) फवारणी करताना घ्यावयाची काळजी(१) फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये. (२) पंपात हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी चांगली होत आहेना, याची खात्री करून घ्यावी. (३) पिकांची उंची व हवेचा झोत लक्षात घेणे, नोझल वाटे पडणाऱ्या द्रावणाची फेक व रुंदी पहावी. (४) पंपाचे वॉशर्स - नोझल स्क्रू खाली मातीत पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, (५) नोझल मध्येच बंद झाल्यावर तारेने साफ करावा _ -तोंडाने साफ करू नये. (६) गळक्या पंपाचा वापर करू नये, क) फवारणी झाल्यावर घ्यावयाची काळजी (१) रोजचे काम झाल्यावर पंप साफ करावा. (२) धुऊन झाल्यावर पंपाने थोडा वेळ पाणी फवारावे. (३) टाकी धुतल्यावर उघडी करून कोरडी होईल अशी ठेवावी. (४) पंपाचे नोझल व गाळण्या रॉकेलने धुऊन घ्यावेत, (५) काम झाल्यावर पेट्रोल पंपातून काढून ठेवावे. (६) वंगणाची गरज असलेल्या भागांना वंगण करावे. (७) फवारणी पंप शक्यतो उष्णतेपासून, धुळीपासून दूर ठेवावेत. ड) व्यक्तीने स्वत:ची घ्यावयाची काळजी (१) फवारणी औषध बनवताना हातात रबरी ग्लोव्हज घालून बनवावे. (२) फवारणी करताना तोंड, नाक, हात हे सर्व भाग झाकलेले (कपड्याने) असावेत. (३) फवारणी झाल्यावर हात-पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत. (४) फवारणी चालू असताना तंबाखूवा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. (५) औषध डबे जमिनीत गाडून ठेवावेत. (६) फवारणी क्षेत्रात फुले,फळे, हुंगू नये किंवा खाऊ नयेत. संदर्भ: सामान्य विज्ञान इ.८वी, प्रकरण ५, मानव निर्मित पदार्थ - २,पान ३४-३७, घटक - खते. ३५