Jump to content

पान:शेती-पशुपालन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्रावण बनविणे व फवारणी : बाजारात जास्त द्रावण फवारणारे (High Volume), कमी द्रावण फवारणारे (Low Volume), अत्यल्प द्रावण फवारणारे (Ultra Low Volume) फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी कीटकनाशकाची क्रियाशील घटकांची मात्रा एक सारखीच असते, फक्त पाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याने वेगवेगळ्या साधनांची निवड करावी लागते. किडनाशकाचे द्रावण तयार करण्याची पद्धतः (१) किडनाशकांच्या डब्यावर क्रियाशील घटकांचे प्रमाण दिलेले असते. (२) द्रावणाची तीव्रता - औषधाबरोबर मिळणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये असते. लागणारे द्रावण X द्रावणाची तीव्रता लागणारे औषध = क्रियाशील घटकांचे प्रमाण क्रियाशील घटकाचे प्रमाण ९/९ ग्रॅम प्रतिलीटर लागणारे द्रावण काढण्यास पिकात काही ठराविक भागात पाण्याची फवारणी करावी. त्यावरून हेक्टरी द्रावण काढावे, किंवा - १ हेक्टर - २.५ एकर = हेक्टरी ५०० लीटर १ एकर - ४० गुंठे = एकरी २०० लीटर १गुंठा - १०० मीटर स्के= प्रतिगुंठा ५ लीटर पिकावरून झिरपून खाली न पडता जेवढे जाईल तेवढे फवारावे. तसेच पंपाची क्षमता व चालण्याचा वेग याही गोष्टी लक्षात घ्याव्यात. कॅलीब्रेशन: एका गुंठ्यावर ५ लीटर औषध फवारायचे असल्यास प्रथम एक गुंठ्यावर - (१) फवारताना चालण्याचा मार्ग निश्चित करा. (२) प्रत्येक दिशेत फक्त एकाच बाजूला (वाऱ्याने अंगावर येणार नाही अशा पद्धतीने) फवारावे. (३) उंची अशी निवडावी की संपूर्ण पट्टा भिजला पाहिजे. (४) चालण्याचा वेग ठरवा. यासाठी टाकीत पाणी घ्या व क्षेत्रावर मारून फवारून झाल्यावर शिल्लक पाणी मोजा व याप्रमाणे वेग किंवा क्षेत्र कमी जास्त करा. एकदा निवडल्यावर हीच पद्धत नियमीत वापरा. अनुभवाप्रमाणे थोडा थोडा बदल करा. फवारणी यंत्राची निगा: यंत्र जास्त दिवस कार्यक्षम रहावीत यासाठी घ्यावयाची काळजी(अ) फवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी (ब) फवारणी करतांना घ्यावयाची काळजी (क) किडनाशक फवारणीनंतर घ्यावयाची काळजी (ड) व्यक्तीने स्वत:ची घ्यावयाची काळजी ३४