पान:शेती-पशुपालन.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकोपयोगी सेवा ः (१) शेतात कोथिंबिरीचे पीक घेऊन काळजी घेणे व ते पीक काढून बाजारात विक्री करणे. (२) पालक, मेथी, शेपू इ. भाज्यांचे उत्पन्न घेऊन विक्री करणे. (३) शेतकऱ्यांस बीजप्रक्रिया करून देणे व पैसे घेणे. (४) शेतकऱ्यास एखाद्या पिकाची लागवड करून देणे व पैसे घेणे. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ. ५ वी, प्रकरण ७ - नैसर्गिक साधनसंपत्ती,पान नं.५६, घटक-माती, प्रकाशन २००६. (२) भूगोल, इ. ५ वी, प्रकरण१६-मानवी व्यवसाय,पान नं.४१-४३,घटक-शेती,प्रकाशन २००७. (३) सामान्य विज्ञान, इ.७ वी, प्रकरण ९ - मातीचे गुणधर्म,पान नं.६९-७४, जमीन व माती, प्रकाशन २००५, प्रकरण १० - वनस्पती संवर्धन आणि शेती मशागत, पान नं. ७७-८४, घटक - शेती काम, प्रकाशन २००५. (४) भारत - प्राकृतिक पर्यावरण, इ. ९ वी, प्रकरण ६, मृदा, पान नं.३६-३९, प्रकाशन २००६. (५) भारत - मानवी पर्यावरण,इ.१०वी,प्रकरण६,भूमी-संसाधने,पान नं.२१-२६,घटक-शेती,प्रकाशन-२००७. दिवस : दुसरा प्रात्यक्षिक : नॅपसॅक पंप दुरुस्ती व औषध फवारणी प्रस्तावना : आपला देश अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर आहे. हरितक्रांती झाल्यावर सर्वाधिक उत्पन्न वाढले. हरितक्रांतीचा गहू उत्पादनावर चांगलाच परिणाम घडून आला. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाणा ही राज्ये पुढे आली. पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कोणत्याही प्रकारची फवारणी करीत नसे. आता मात्र लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्य, उत्पन्न कमी पडू लागले आहे. त्यात औद्योगिक, आधुनिक यंत्राचा, तंत्राचा वापर करून उत्पन्न वाढविले जात आहे. त्या उत्पन्नावर औषधांचा जास्त परिणाम होत आहे. तरी आज फवारणीसाठी विविध यंत्राचा वापर केला जात आहे. त्यात आज आपण नॅपसॅक पंपाविषयी माहिती पाहणार आहोत. पूर्व तयारी : निदेशकाने करावयाची पूर्व तयारी- (१) नॅपसॅक पंप नसेल तर तो आणून ठेवावा. (२) नॅपसॅक दुरुस्त नसेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवावे. (३) फवारणीसाठी लागणारे औषध आणून ठेवावे. (४) नॅपसॅक पंप दुरुस्तीवर एखादा माहितीपट दाखवण्याची व्यवस्था करावी. प्रात्यक्षिक पूर्वतयारी : (१) प्रात्यक्षिकास लागणारे सर्व साहित्य जमा करावे. (२) मुलांचे २ गट करून कामे वाटून द्यावीत. (३) फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयीच्या सूचना द्याव्यात. उपक्रमाची निवड : (१) शाळेजवळील एखाद्या शेतकऱ्याचा नादुरुस्त नॅपसॅक पंप दुरुस्त करून द्यावा. (२) नॅपसॅक सुरू केल्यानंतर त्यामार्फत फवारणी करून पहावी. (३) शाळेतील शेतात लावलेल्या पिकांवर फवारणी करावी. (४) शेतकी औषध दुकानास भेट देऊन औषधांविषयी माहिती घ्यावी. नॅपसॅक पंपाचे तत्व : हवेच्या दाबावर चालतो. अपेक्षित कौशल्ये: (१) साहित्याची हाताळणी करता येणे. (२) फवारणी करता येणे. (३) फवारणीसाठी द्रावण तयार करता येणे. (४) पंप दुरुस्त करता येणे. (५) औषधे ओळखता येणे. नॅपसॅक पंप खोलणे-जोडणे. (७) विविध स्पॅनरची हाताळणी. (८) पंप चालवून पाहणे. (६) ३२