पान:शेती-पशुपालन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेती-पशुपालन इयत्ता : ९ वी दिवस : पहिला (अ) जमिनीतील प्रमुख घटक व त्यांचे कार्य, पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, जीवाणू खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादीची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ "विविध अन्नद्रव्येची गरज असते. ही अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. ह्यापैकी प्रमुख ३ अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ. (१) नत्र (नायट्रोजन) - (कार्य) - पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढविणे तसेच पिकास लुसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करते. तसेच नायट्रोजनमुळे पिकाची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. नत्र कमतरतेची लक्षणे - (१) पिकाची पाने पिवळी पडतात. (२) पिकाची वाढ खुंटते. (२) स्फुरद (फॉस्फरस)-(१) पिकातील योग्य फॉस्फरसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांची वाढ होते. (२) पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकत येते. त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही. (३) नैसर्गिक रित्या फळे व्यवस्थित पिकण्यात मदत होते. (४) पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवून पिकाच्या मुळावरील डायझोबियमच्या गाठी वाढविण्यास मदत होते. स्फुरद कमतरतेची लक्षणे - (१) पिकाच्या पानांना जांभळट रंग येतो. (२) पाने लांबट होऊन वाढ थांबते. (३) पालाश (पोटॅशिअम) - (१) पिकातील पोटॅशियमच्या उपलब्धतेमुळे झाड सशक्त बनते. (२) त्याचबरोबर झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. (३) पोटॅशियममुळे तृणधान्याच्या खोडाची ताकत वाढते त्याने ते जमिनीवर पडत नाही वा झाड कोलमडत नाही. पोटॅशियम कमतरतेची लक्षणे - (१) पानाच्या कडा तांबडसर रंगाच्या होतात. (२) खोड आखूड होते व शेंडे गळतात. अधिक माहिती- पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये खालील प्रकारे आहेत - मुख्य अन्नद्रव्य :- नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम अन्नद्रव्य :- कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सुक्ष्म अन्नद्रव्य - कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅग्नीज, बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिण्डेनम, क्लोरीन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. २८