पान:शेती-पशुपालन.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) दुधामध्ये साखर टाकलेली असल्यास त्याचे सॅम्पल परीक्षा नळीत घेऊन ती परीक्षानळी उकळत्या पाण्यात धरल्यास साखर जळून परीक्षानळीच्या तळाशी चॉकलेटी रंग तयार होतो. (४) गाईच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण ४ ते ५%, म्हशीच्या ५ ते ८%, शेळीच्या ३ ते ४% व मेंढीच्या दुधात ४ ते ६% एवढे असते. (५) गवळ्याला देण्यात येणारा दुधाचा दर हा लॅक्टोमीटर व फॅटचे प्रमाण यावरती अवलंबून असतो. स्वाध्याय :(१) वरील सर्व कौशल्ये चांगली आत्मसात होण्यास किमान ८ दिवस डेअरीत जाऊन अनुभव घ्या. (२)शक्य असल्यास जवळील दूध पाश्चरायझेशन केंद्रास भेट द्या, तेथील कामकाजाचा आढावा घ्या. विशेष माहिती दुधाची भुकटी : बाजारात मिल्क पावडर नावाने मिळणारी दूध भुकटी तुम्ही पाहिली असेल. एक चमचा पावडरमध्ये ठराविक प्रमाणात पाणी घालून त्यापासून दूध मिळवता येते. ज्या ठिकाणी रोज ताजे दूध मिळू शकत नाही अशा ठिकाणी तिचा फार उपयोग होतो. दुधापासून भुकटी कशी मिळत असेल ? प्रथम दुधातील अशुद्धी दूर करून ती प्रमाणित करतात. दुधाला उष्णता देऊन पाण्याचा अंश काढून टाकतात. मोठ्या प्रमाणात उष्ण असणाऱ्या बंदीस्त खोली (जिची क्षमता गरजेनुसार ठरते) दुधाचे तुषार (नोझलच्या सहाय्याने) सांडले जातात. उष्णतेमुळे हे दूध खोलीच्या तळाला टेकेपर्यन्त त्याची भुकटी तयार होते. यासाठी लागणारी उष्णता निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या उष्णतेपेक्षा अधिक असते. या तीव्र उष्णतेत रोगकारक आणि घातक सूक्ष्मजीवांचा नाश होतो. त्यानंतर ही भुकटी हवाबंद डब्यात साठवण्यात येते. त्यामुळे ही दीर्घकाळ सुरक्षित राहते. * दुधाच्या पावडरमध्ये ०.५% फॅट असते. पावडरीस गोड व सुमधूर असा वास व चव असते. दुधाचा महापूर : भारत सरकारने 'दूध महापूर' योजनेद्वारे दूध उत्पादन वाढीस गती देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध योजनेचा एक प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना दुधाची योग्य किंमत देणे व शहरांसारख्या मोठया उपभोक्ता क्षेत्रांना ग्रामीण भागाशी जोडणे हा आहे. देशातील सर्वसामान्य जनतेच्या आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाणे वाढावे,त्याचप्रमाणे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा, हे या योजनेचे हेतू आहेत. इतर माहिती दुग्ध व्यवसाय : या पॅक्टीकलचा उद्देश म्हणजे दूध संकलन केंद्राचे (Dairy) कामकाज कसे चालते, त्यांची कार्ये (Activities) काय असतात याची माहिती घेणे, तसेच AI Centre मध्ये प्रत्यक्ष जनावरांची (गाय/म्हैस) कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा कशी करतात, याबद्दल माहिती व अनुभव घेणे. Dairy दूध संकलन केंद्र - सहकारी तत्त्वावर चालणारी संस्था - डेअरीचे व्यवस्थापन: चेअरमन (१) गवळी (सभासद)- घरोघरी दूध वाटप करणारे सदस्य बॉडी (कायमस्वरूपी) (२) सदस्य कायमस्वरूपी - संस्था चालक सदस्य सेक्रेटरी (३) सेक्रेटरी-दररोज कामाचा हिशोबनीस (४) चेअरमन सर्व कार्याचा (Activities)जबाबदार गवळी (सभासद) २३