पान:शेती-पशुपालन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- पूर्व तयारी निदेशकांनी करावयाची पूर्व तयारी (१) सर्वप्रथम दूध संकलन केंद्राची परवानगी घेवून ठेवा. (२) संकलनास दूध देणाऱ्या शेतकऱ्याची / गवळ्याची ही अगोदर परवानगी घ्या. (३) संकलन केंद्रास, गवळ्यास विचारावयाच्या प्रश्नांची कल्पना अगोदरच द्या. (४) संकलनातील काही तपासण्या स्वतः अगोदर करून पहा. (५) गावात दूध संकलन केंद्र नसेल तर सी.डी.दाखवण्याची व्यवस्था करा. (६) गावात दूध संकलन केंद्र नसेल तर मुलांचे २ ते ३ गट करून जवळच्या गावातील संकलनास भेट द्या, प्रात्यक्षिकाची पूर्व तयारीः (१) मुलांचे २ ते ३ गट करून घ्या. (२) आपल्या विभागात असणाऱ्या सर्व साधनांची (उदा. लॅक्टोमीटर, दूध इत्यादी.) जुळवाजुळव करा. (३) मुलांना दूध संकलन केंद्रास भेट देण्यास घेऊन जा. (४) दूध केंद्रावर गेल्यावर पाळावयाच्या सूचनांविषयी अगोदर मुलांना सांगून ठेवा. उपक्रमांची निवड : (१) वस्तीवरच्या छोटया दूध डेअरीस भेट देऊन तेथील व्यवस्थापनाविषयी माहिती द्या. (२) तालुक्याच्या ठिकाणच्या अद्ययावत दूध संकलन केंद्रास भेट देवून व्यवस्थापनाविषयी माहिती घ्या. (३) दूध भेसळच्या विविध तपासण्या करून पहा. (४) दुधातील भेसळ घरीच लॅक्टोमीटरने तपासून पहा. (५) गर्बर मशीनच्या साहाय्याने दुधातील स्निग्धांश तपासून पहा. अपेक्षित कौशल्ये : (१) उपकरणांची हाताळणी करता येणे. (२) लॅक्टोमीटरवरील रिडींग वाचता येणे. (३) दुधाचे मोजमाप करता येणे. (४) दुधातील भेसळ ओळखता येणे.. (५) दुधातील लॅक्टो मोजता येणे. (६) डेअरी व्यवस्थापन समजावून घेणे, (७) लॅक्टोमीटर हाताळणे. (८) दुधातील फॅट काढणे. साहित्य : दूध, केरोसीन, पाणी इ. साधने : बादली, कॅन, द्रव पदार्थ मोजण्याची मापे, लॅक्टोमीटर, मेजरिंग सिलींडर, फॅट मशीन, प्रेशर स्टोव्ह, पातेले, परीक्षानळी, चिमटा. कृती: (१) गवळ्याकडून दूध आल्यावर त्यातील सँपल घेऊन डेअरी कामगाराच्या मदतीने खालील परीक्षा करा, अ. लॅक्टोमीटर रिडींग मोजा. ब. फॅट परीक्षा क. साखर भेसळ परीक्षा ड. सोडा भेसळ परीक्षा (२) एकूण दूध किती लीटर आहे ते मोजा. (३) पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्याची व्यवस्था करा. दक्षता : (१) लॅक्टोमीटर रिडींग घेताना दुधामधील फेस सुरुवातीस वेगळा करून मगच रिडींग घ्या. (२) लॅक्टोमीटर रिडींग व फॅट परीक्षा करताना एका सँपलची परीक्षा केल्यानंतर आलेले रिडींग लिहून मगच दुसरे सँपल परीक्षेसाठी घ्या. (३) दुधाची साखरभेसळ परीक्षा करताना उकळते पाणी अंगावर उडणार नाही, याची काळजी घ्या. आपणांस हे माहीत आहे का? (१) गावरान गाईच्या निरश्या दुधाचे लॅक्टोमीटर रिडींग साधारण ३० असते. (२) दुधात खायचा सोडा टाकलेला असल्यास त्याची परीक्षा दूध पिऊन करता येते. दूध खारट लागते.