पान:शेती-पशुपालन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशेष माहिती जनावर निरोगी असेल तर त्याचे तापमान हे सर्वसाधारण असते. त्याशिवाय त्या जनावराचे वजनही योग्य असते. जर जनावर आजारी असेल तर त्याच्या वजनात घट होते. तेव्हा त्या जनावरास कोणता तरी आजार झालेला असतो. सर्वसाधारणपणे जनावरांस खालील आजार होऊ शकतात. (१) फऱ्या (२) घटसर्प (३)स्तनदाह (४) बुळकांडी (५) तिवा (६) लाळ खुरकत (७) पोट फुगी. जरजनावर निरोगी रहावयाचे असेल तर जनावरांना खालील लस देणे आवश्यक आहे. जनावरांसाठी लसीकरण तक्ताः क्र. प्रथम लस प्रकार प्रतिबंधक शक्ती पुन्हा १. दीड महिना FMD | लाळखुरी Baif टिश्यू कल्चरल ६महिने | अडीच महिने, दर ६ महिने २. दोन महिने घटसर्प तुरटीयुक्त/तेलमिश्रित १ वर्ष १ वर्षाने । ३. तीन महिने goodnigi (Renderpest) २ वर्ष ६ महिन्यांपुढील गाभण गाईंना देऊ नये. ४. पाच महिने फऱ्या (Black Quarter) १वर्ष १ वर्षान ५. पाच महिने फाशी (Auturax) १ वर्ष दरवर्षी संदर्भः (१) सामान्य विज्ञान, इयत्ता ७वी, प्रकरण ११, पशुसंगोपन, पान नं.८५-८९, प्रकाशन २००५ (२) भारत-मानवी पर्यावरण, इयत्ता १०वी,प्रकरण ७,पशुसंसाधने, पान नं.२९, प्रकाशन २००७ दिवस : सहावा प्रात्यक्षिक : दूध डेअरीस भेट देणे. प्रस्तावना : भारतात प्राणी हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. पशुपालन आणि दुग्ध विकास यांना भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषतः भूमिहीन, लहान भूधारक यांचा पशुपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. उपनागरी भागातील लोकांचा हा पूरक व्यवसाय आहे. डोंगराळ, आदिवासी तसेच अवर्षणग्रस्त भागात कुटुंबांना पुरेल इतके पीक उत्पादन होत नाही म्हणून असे लोक पशुपालन करतात. शेतीच्या एकूण उत्पादनापैकी ३०% उत्पादन पशुपालन या व्यवसायामुळे प्राप्त होते. आज भारतात शेती बरोबरच पशुपालन व्यवसायास जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आज पशुपालन व्यवसायातून सर्वात जास्त उत्पन्न हे दुधापासून मिळत असून भारत देश हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. म्हणून दूध संकलन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना आपल्या जवळच संकलन केंद्र असल्यास व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच दूध वाहतुकिचा प्रश्न निर्माण होत नाही. तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. तसेच दूध संकलन केल्यामुळे व त्यावर तेथे प्रक्रिया केल्यामुळे दुधाची प्रत चांगली राहते, त्यामुळे दुधास योग्य भाव मिळतो. तेव्हा आज आपण दूध संकलन कसे केले जाते व त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते ते पाहू. २१