पान:शेती-पशुपालन.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकृती: अX अरब गणन: जनावराचे अंदाजे वजन (किलो) = १०४०० या सूत्रात आलेल्या किंमती भरून उदाहरण सोडवल्यास येणारे उत्तर म्हणजे जनावराचे वजन होय, दक्षता : (१) मापे घेताना जनावर सरळ उभे असताना घ्यावीत (जनावर वाकलेले असताना मापे घेतल्यास वजनाचा अंदाज चुकीचा येईल.) (२) कापडी टेप मापे झाल्यावर लगेच गुंडाळून ठेवावा अन्यथा तो जनावर खाण्याची शक्यता असते. (३) अनोळखी जनावरे असल्यास मापे घेण्यासाठी संबंधित मालकाची मदत घ्यावी, अन्यथा जनावरांकडून इजा होण्याची शक्यता असते. आपणांस हे माहीत आहे का? लंबगोलाच्या क्षेत्रफळाचे सूत्र थोडासा बदल करून वापरले आहे. (१) जनावराला त्याच्या वजनानुसार आहार द्यावा लागतो. (२) जनावरांचे वजन काढताना शक्य झाल्यास जनावराचे वजन तराजूवरती करून दोन्ही वजनातील तफावत पहा. उदा. : एका गायीचे शरीराच्या मापावरून अंदाजे वजन काढणे. उदा. : गायीच्या छातीचा घेर १७८ से.मी. आहे व शिंगापासून माकडहाडापर्यंतचे अंतर १७२ से.मी. आहे. तर तिचे वजन किती? अX अरब उत्तर : सूत्र- जनावराचे अंदाजे वजन (किलो) = १०४०० (अ = छातीचा घेर(सें.मी.), ब = दोन शिंगांच्या मध्यापासून माकडहाडापर्यंतचे अंतर (सें.मी.)) ... दिलेल्या माहितीनुसार, अ= १७८ से.मी., ब = १७२ से.मी. 178X178X 172 3 1684X172 वजन = 10400 10400 वजन = 524Kg. . गायीचे वजन 524 किलो (अंदाजे) आहे. २०