पान:शेती-पशुपालन.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदा. २: एका व्यक्तीचे सर्वसाधारण तापमान 37°C आहे. तर त्याचे फॅरेनाईटमध्ये रूपांतर करा. ___ सूत्रः =F-३२ . ३७-F-३२ '. ३७४१ = ५ (F-३२) ..३३३ = ५F-१६० .. ५F= ३३३ + १६० F= 2 (F = ९८.६) एका व्यक्तीचे फॅरेनाईटमधील तापमान (२) जनावरांचे दातावरून अंदाजे वय ओळखणे : अपेक्षित कौशल्य : दातांवरून जनावराचे वय काढणे. प्राणी : गाय, बैल, वासरू, कृती: (१)प्रथम एका जनावराच्या (गाय/बैल) जबड्यातील दात किती आहेत हे पाहण्यासाठी जनावराच्या मालकाच्या मदतीने त्या जनावराचा जबडा उघडा, (२) जबड्यामध्ये दिसणाऱ्या दातांचे व्यवस्थित निरीक्षण करा, (३) निरीक्षण करताना दुधाचे दात किती व कायमचे दात किती आहेत याची व्यवस्थित पाहणी करा. (४) वरील पाहणीनुसार वहीमध्ये जबड्यातील दात दर्शवणारी आकृती काढा. (५) आकृतीचे नीट निरीक्षण करून जनावराच्या वयाचा बरोबर अंदाज करा. दक्षता:(१) जनावरांचे दात पाहताना आपला हात चावला जाणार नाही याची काळजी घ्यावी. (२) अनोळखी जनावर असल्यास दात पाहताना संबंधित मालकाची मदत घ्यावी अन्यथा जनावराकडून इजा होण्याची शक्यता असते. आपणांस हे माहीत आहे का? (१) गाय, बैल, वासरू, शेळी, बोकड यांना वरील जबड्यात पुढचे दात नसतात. परंतुदाढा असतात. (२) जनावराच्या वयाच्या अंदाजावरून त्यांची उपयोगिता, किंमत व वाढ याचा अंदाज करता येतो. स्वाध्याय : (१) आपण राहता त्या परिसरातील किमान पाच वेगवेगळ्या जनावरांचे दात पाहून अंदाजे वय सांगा. (२) तुम्ही सांगितलेले वय व प्रत्यक्ष वय यांची तुलना (तफावत) जनावर मालकाशी बोलून करा. विशेष माहिती : जनावरांच्या दातावरून अंदाजे वय ओळखणे. गाय / बैल / म्हैस १. जन्मतः दुधाचे २ दात २. १५ दिवसांनंतर दुधाचे ४ दात २१ दिवसांनंतर दुधाचे ६ दात ३० दिवसांनंतर दुधाचे ८ दात ५. २ ते ३ वर्षांनी on- कायमचे २, दुधाचे ६