पान:शेती-पशुपालन.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हृदय ठोके ह्यांच्यावरही परिणाम होतो. म्हणून गायीचे तापमान मोजणे गरजेचे आहे. जर जनावराचे तापमान सर्वसाधारण असते, तेव्हा ते जनावर निरोगी आहे असे समजले जाते. तर आज आपण जनावराचे तापमान कसे मोजले जाते व दातांवरून वय कसे ठरवले जाते हे पाहू. पूर्वतयारी : उपक्रमांची निवड : (१) एका शेतकऱ्याच्या गायीचे तापमान मोजून देऊन ते मोजणे का आवश्यक आहे हे पटवून द्या. (२) गावातील एका शेतकरी गटास जनारांचे दात मोजून वय कसे ठरविले जाते हे सकारण सांगा. (३) गावातील जनावराच्या दवाखान्यास भेट देऊन तेथील डॉक्टरांच्या साहाय्याने जनावरांचे तापमान कसे मोजतात ते शिकून घ्या. । (४) शेळी, गायी, म्हैस, मनुष्य, कोंबड्या यांचे तापमान मोजून फरक कसा व का पडतो ते पहा. (५) तापमान मोजण्याचे फायदे शेतकऱ्यांना सांगा. निदेशकांनी लक्षात घ्यावयाच्या बाबी : (१) प्रथम जनावराच्या मालकाची पूर्व परवानगी घेणे. (२) जनावर मारत नसल्याची खात्री करून घ्यावी. (३) मुलांचे ३ गट करून वेगवेगळ्या प्राण्यांचे वय, तापमान कसे तपासावे हे सांगा/पूर्व कल्पना द्या. (४) जनावराचे डॉक्टर गावात असतील तर त्यांच्याकडून माहिती जमवा. (५) पूर्वी शेतकरी कशा पद्धतीने जनावराचे वय ओळखत असत हे जाणून घ्या. (६) या प्रात्यक्षिकाविषयी सी.डी. दाखवण्याची व्यवस्था करा. प्रात्यक्षिकाची पूर्व तयारी : (१) प्रात्यक्षिकास लागणाऱ्या सर्व साधनांची व साहित्याची प्रथम जुळवाजुळव करून घ्या. (उदा. दोर, थर्मामीटर, घड्याळ इ.) (२) थर्मामीटर सुस्थितीत आहे का ते पहा. (३) गटात कामे वाटून घ्या. अपेक्षित कौशल्ये : (१) थर्मामीटर हाताळता येणे. (२) थर्मामीटरवरील रिडींग वाचता येणे. (३) जनावर हाताळता येणे. (४) सेल्सीयस व फॅरेनाईटमध्ये मोजता येणे. (५) दातावरून वयाचा अंदाज करणे. (६) कोणत्याही जनावराचे कोठे तापमान मोजतात हे पाहणे. (१) क्लिनिकल थर्मामीटरच्या साहाय्याने तापमान मोजणे. साधने: १. क्लिनिकल थर्मामीटर २. घड्याळ पक्षी व प्राणी : कोंबडी, गाय, शेळी, माणूस, म्हैस, मेंढी , कुत्रा. आकृती: पारा किंवा रंगीत अल्कोहोल ३६.९°C मानवी शरीराचे सर्व साधारण तापमान ९८.४°f कृती: (१) थर्मामीटरमधील वर चढलेला पारा थर्मामीटर हाताने झटकून शून्य रेषेवर आणा. (२) तापमान मोजताना थर्मामीटरचा पाऱ्याचा बल्ब सर्व बाजूंनी त्वचेच्या संपर्कात येईल असा धरा. १४