पान:शेती-पशुपालन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विशेष माहिती : कलम करण्याचे निरनिराळे प्रकार अ.क्र. अभिवृद्धीचा प्रकार | कोणत्या वेळी केल्यास चांगले कोणती झाडे छाट कलम खरीप अगर रब्बी हंगामात अंजीर, द्राक्षे, शेवंती, बहुवार्षिक झाडे, वेली (जाई-जुई) दाब कलम पावसाळा तगर, कागदी लिंबू, पेरू, वेली वगैरे गुट्टी कलम पावसाळा ड्रेसिना, क्रोटन, मुसाडा एक्झोटा, डाळिंब | पाचर कलम ऑक्टोबर/नोव्हेंबर आंबा व इतर कोणतेही फळझाड ५ डोळा भरणे | नोव्हेंबर ते फेब्रुवारी गुलाब, संत्री, मोसंबी इ. (वरील तक्ता विद्यार्थ्यांना माहितीसाठी लिहून देणे गरजेचे आहे) लोकोपयोगी सेवा: (१) छाट कलमाची विविध प्रकारची १०० रोपे तयार करून विक्री करा. (२) शाळेच्या शेजारील /गावातील शेतकऱ्याचा डाळींबाच्या बागेत गुट्टी कलमे बांधून द्या. (३) गुलाबाची १०० रोपे छाट कलमाद्वारे तयार करून त्याची विक्री करा. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ.७ वी, प्रकरण१६,सजीवांतील प्रजनन- वाढ,पान नं.१२२-१२७, प्रकाशन २००५ (२) विज्ञान आणि तंत्रज्ञान -भाग २, इ. ९ वी, प्रकरण ११, जीवन प्रक्रिया, प्रजनन, पान नं.१५४-१६४,घटक - शाकीय प्रजनन. दिवस : चौथा प्रात्यक्षिक : जनावरांचे तापमान मोजणे, दातांवरून वय ठरविणे, प्रस्तावना : आपल्या देशात शेतीस जोडव्यवसाय म्हणून पशुपालन व कुक्कुटपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे पशुधनास भारतीय अर्थव्यवस्थेत फार महत्त्वाचे स्थान आहे. दूध उत्पादन, मांस उत्पादन व शेतातील कामे करण्यासाठी आपण जनावरे पाळतो. या जनावरांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकरी बाजारामध्ये जाऊन जेव्हा जनावर खरेदी करतात, तेव्हा ते आपल्या अनुभवाच्या जोरावर ते जनावर पारखून घेतात. म्हणजे सर्वसाधारणपणे शेतकरी जनावराचे दात कसे आहेत, किती आहेत यावरून त्याचे अंदाजे वय ओळखतात. याशिवाय ते गायीच्या किंवा त्या जनावराच्या शिंगाच्या वलयावरूनही वय ओळखतात. शिवाय ते जनावर आजारी आहे की नाही हेही सहज ओळखतात. गायीचे (माणसाचे सुद्धा) तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मेंदूतील एक विशिष्ट भाग (Hypothalmuo) काम करत असतो. जर शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी झाले तर पेशी मरू शकतात. आणि श्वासोच्छ्वास क्रियावर पण परिणाम होतो. जेव्हा गायीचे तापमान वाढत असते किंवा तिला ताप येत असतो. तेव्हा विशिष्ट जीवाणू/विषाणुच्या संक्रमणामुळे hypothalmuo चे काम बंद होते. परिणाम म्हणून गायीची पचनक्रिया १३