पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बेघर मिस्त्री अशी काढता येतील. मुसलमान समाज हा दलितांतला दलित, दलितांची भाग्येसुद्धा त्याच्या नशिबी येत नाहीत. मुसलमान समाजाच्या आर्थिक समस्यांचा एखादासुद्धा वस्तुनिष्ठ अभ्यास उपलब्ध नाही. त्या समाजातील महमंद अली जिनांपासून शहाबुद्दीनपर्यंत भल्या भल्या बुद्धिवान नेत्यांनासुद्धा मुस्लिम समाजाच्या आर्थिक समस्यांना हात घालणे जमले नाही. धार्मिक भावनांना आवाहन करून आपला मतदारसंघ पक्का करून घेण्याचेच धोरण त्यांनी अवलंबिले. मुसलमान समाजाची जी शांकांतिका आहे तीच हिंदूंची, तीच दलितांची. स्वत:च्या कर्तबगारीवर नव्या जनसंघटना बांधण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा जन्माच्या अपघाताने ठरणाऱ्या धर्माने आणि जातीने लोकांना बांधून घेणे किती तरी जास्त सोपे आणि सोईस्कर. जातीयवाद बोकाळण्याचे सर्वांत मोठे कारण हीच सोय आहे.

(सा. ग्यानबा, १५ आणि २९ ऑगस्ट १९८८)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १९९