पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/202

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'ढोल वाजतोय' कार्यक्रम झाल्यानंतर लगेच तीन तासांचा खास कार्यक्रम झाला. 'आक्रोश' सिनेमाच्या दूरदर्शनचा. ग्रामीण जीवनातील तळागाळाच्या लोकांची दु:खे, जी दाहक आणि विदारक तर खरीच; परंतु शहरी कलावंतांच्या विकृत कलाबुद्धीला आणि अर्धनग्न उत्तानतेच्या प्रदर्शनाला वाव मिळण्याच्या दृष्टीने सोईस्कर. माणसाला माणूस म्हणून जगू न देणाऱ्या खेड्यातील या व्यवस्थेचे कारण गावातलाच दुसरा एक समाज किंवा व्यक्ती असे ठासून ठासून भासवणे हा या तथाकथित प्रागतिक कलावंताचा आवडता छंद आणि उद्योग.


(सा.ग्यानबा, २९ जून १९८७)

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १९३