पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पक्षाने नावात शेतकरी आणि कार्यक्रमांत 'रास्त भाव' असे मातीचे कुल्ले चिकटवून घेतले. यथावकाश हे कुल्ले गळून पडले.

 शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेतकरी संघटनेने हाती घेतला. हातचे काही राखून न ठेवता आंदोलने केली. अकरा राज्यांत संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शेतकरी संघटना शेतीमालाच्या भावाचा प्रश्न दुसऱ्या कोणत्या भाडोत्री गाड्याला जुंपत नाही. या प्रश्नाचे सर्वंकष महत्त्व सांगणारी सैद्धांतिक बैठक संघटनेने मांडली. शेतीमालाला रास्त भाव मागणाऱ्या सर्वांना ही सैद्धांतिक बैठक मान्य पाहिजे. मार्क्सवाद आणि 'भाव'वाद यांचा ओढूनताणून समास घडवून आणायचा नाही. मार्क्सचे अर्थशास्त्र तपासून त्यांत इतिहासातील प्रत्यक्ष अनुभवाप्रमाणे दुरुस्ती करावयाची आहे. शेकापने ही 'झेप' दाखवली नाही. एक फार मोठी संधी गमावली.


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १४९