पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.१. कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर

 आम्ही ‘शून्य कचरा' ही संकल्पना गेली चौदा वर्षं अंगीकारली असून आमच्या घरातून कचरा म्हणून कोणतीही वस्तू बाहेर फेकली जात नाही. कचऱ्याला आम्ही कचरा न म्हणता त्यांना वापरलेल्या वस्तू म्हणजेच ‘वाव' म्हणतो. “आम्ही कचरा तयार करणारी माणसं नाही" असं अभिमानानं म्हणतो. आमच्या घराच्या दारावर येथे कचरा तयार होत नाही अशी पाटी लावलेली आहे. कारण ही पाटी म्हणजे आमच्या वागण्याची जाहिरात आहे. शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणायला फार पैसा आणि खूप वेळ लागतो हा समज पूर्णपणे खोटा आहे आणि आम्ही आचरणात आणत आहोत तेच कच-याच्या प्रश्नाचे एकमेव आणि १00 टक्के उत्तर आहे. “शून्य कचरा' ही संकल्पना प्रत्येक नागरिकानं आचरणात आणावी म्हणून मी संधी मिळेल तेव्हा आणि त्या ठिकाणी या संकल्पनेचा प्रचार करतो. लोकांना सांगत असतो. ह्या प्रवासात मला आलेले दोन अनुभव हे आपल्या समाजाचं बोलकं चित्र आहे.
 पहिला अनुभव : मी माझ्या मित्राच्या दुकानात शून्य कचऱ्याविषयी बोलताना तेथे त्या संकुलाचा सफाई कामगार उभा होता. मी कचऱ्याविषयी काहीतरी बोलतो आहे हे ऐकून तो ते लक्षपूर्वक ऐकत उभा होता. कारण तो त्याच्या जिव्हाळ्याचा विषय होता.दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राचा मला फोन आला. तो फोनवर म्हणला, "ताम्हनकर कालचे तुझे सांगणे ऐकून आमचा सफाई कामगार कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर * ५काय म्हणाला माहीत आहे? तो म्हणाला, हे साहेब तर आमच्या पोटावर पाय आणताहेत! हे सांगतात त्याप्रमाणे जर का सगळे वागू लागले तर आम्हांला काम काय उरणार ? आमचे खायचे वांदे होणार."
 दुसरा अनुभव : आम्ही मित्र बरेच दिवसांनी एकत्र जमलो होतो. फार वर्षांनी सगळे भेटत होतो त्यामुळे प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं होतं. मीदेखील माझी शून्य कचऱ्याची संकल्पना सर्वांना सांगितली ह्या संकल्पनेचा मी प्रचार करतो. ते आता माझं मिशन आहे, हे ऐकून माझा एक प्रतिथयशी उच्चविद्याविभूषित आणि पैशाने गब्बर असलेला मित्र लगेच म्हणला,“अरे असं वागलं तर सफाई कामगार मरतील. ज्यांना दुसरं काही येत नाही, तेच लोक ही कामं करतात!"
 दोन्ही अनुभवांवरून आणि दोघांच्याही वक्तव्यावरून असा निष्कर्ष निघतो की,

 १) सफाई कामगाराला हे काम घाण आहे. कचऱ्यात काम करण्यामुळे त्याच्या आयुष्याची बरबादी होत आहे. कचऱ्यात काम केल्यामुळे आपल्याला व्यसन लागते आणि रोग होतात, याची त्या सफाई कामगाराला जाणीवच नाही.


कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर * ५