पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मागणार नाही. असे केल्याने प्लॅस्टिकच्या एका पिशवीचा वापर कमी होईल. तरीदेखील, आपल्या घरात अनेक मार्गानी पातळ प्लॅस्टिक रोज येतच असते, त्याचे काय करायचे ?
 येणारे प्लॅस्टिक टाकायचे नाही, असे आपण आता ठरविले आहे. ते प्लॅस्टिक आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहे. त्यामुळे आता ती पिशवी किंवा तो रॅपर किंवा ते सँचेट स्वच्छ करणे हे ओघाने आलेच ! प्लॅस्टिकची पिशवी सुरीच्या साहाय्याने तिन्ही बाजूंनी कापून उघडली, तर तिचे रूपांतर सपाट प्लॅस्टिकमध्ये होईल. आता हे प्लॅस्टिक सहज धुऊन कोरडे करता येईल. अशा प्लॅस्टिकपासून एक नवे उत्पादन बनू शकते.
 सोबतच्या फोटोत आपल्याला प्लॅस्टिकचा एक पॅकिंग पाउच' दिसत आहे. त्यावर पुढील चार वाक्ये लिहिली आहेत -

 हा पॅकिंग पाउच एका वेगळ्या जाड प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनविला असून, ते प्लॅस्टिक सहजासहजी फाडता येत नाही; आणि पाउच चारी बाजूंनी सिलबंद असल्यामुळे आत भरलेले पातळ प्लॅस्टिक बाहेर येत नाही.

 कारखान्यातून बाहेर पडणारा माल पॅक करण्यासाठी सध्या गवत/पेपरवूल/फोमचे तुकडे/थर्मोकोलचे तुकडे असे विविध पदार्थ वापरले जातात. एकदा का पॅकिंग उघडले की या पदार्थांचे काय करायचे, असा प्रश्न असतो. या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नसते. म्हणून मग त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचा सोपा मार्ग अवलंबिला जातो.


४४ * शून्य कचरा