पण ते पॅकिंग मटेरिअलची काळजी घेत नाहीत. कमी किमतीत उत्कृष्ट पॅकिंग ही कल्पना बदलायला पाहिजे. कारण कमी किमतीतील पॅकिंग मटेरिअल, काम झाले की कवडीमोलाचे असते. जी वस्तू आपल्या मालाचा दर्जा टिकविण्यासाठी कारणीभूत असते, तिला इतके कमी लेखून चालणार नाही, कारण तिला वाऱ्यावर सोडल्यावर आपले काय नुकसान होते, ते आपण अनुभवतच आहोत.
'वापरा अन् फेकून द्या' ही कल्पना - ‘वापरा अन् वापरतच राहा' अशी बदलली गेली पाहिजे.
ज्या वेळी use & throw ही कल्पना माणसाला भावली, त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आपली लोकसंख्या आजच्यापेक्षा खूप कमी होती. प्लॅस्टिकचा शोध नव्यानेच लागला होता. त्याच्या अनेक गुणधर्मांचा मोह आपल्याला पडला होता. त्या मोहाचा चटका केवढा भयानक असतो, हे आता आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. चटक्याचा अनुभव येईपर्यंत लहान मूल एकदाच विस्तवाजवळ जाते. एकदा चटका बसला की पुन्हा ते चटका खात नाही. आपल्याला चांगलेच चटके बसत आहेत. लहान मूल जर अनुभवातून शहाणे होते, तर आपण का नाही होणार ? आपण तर मोठी माणसे आहोत !
"हे तुम्ही करून दाखवाच"
युरोपमध्ये म्हणे प्रत्येक नागरिक आपल्या आयुष्यातील एकदोन वर्षे सैन्यात दाखल होतो. असं सैनिकी आयुष्य जगल्यामुळे त्यांच्या वागण्यात शिस्त येते. देशाचं संरक्षण म्हणजे काय हे समजतं. देशप्रेम, देशनिष्ठा अंगी बाणली जाण्याचे हे बाळकडूच आहे. एक दिवस घंटागाडीवर काम कराल का ?
हे तुम्ही करून दाखवाच अन्यथा |
वापरा आणि वापरत राहा * २७