पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 परवा मी एका पानाच्या टपरीसमोर उभा होतो. बाईच्या चेहऱ्यावरून ‘अवंतिका बट' जशी खाली यावी, तशा या टपरीच्या तोंडावरून अनेक पाउचच्या माळा खाली लटकल्या होत्या. एक माणूस आला. झाडावरील एखादे फळ तोडावे, तसा त्याने त्या पाउचच्या माळेतील एक पाउच तोडला. तेथेच उभे राहून त्याने तो पाउच दाताने फाडून उघडला. त्यातील पदार्थ आ वासून तोंडात टाकला आणि तो पाउच तेथेच रस्त्यावर टाकून दिला. मी सहज त्या माणसाच्या लक्षात आणून दिले की, आपण पैसे देऊन विकत घेतलेला पाउच रस्त्यावर पडला आहे. तो माणूस माझ्याकडे बघतच राहिला. तो वापरून झालेला पाउच खाली रस्त्यावर टाकून दिला यात त्याला काहीच गैर वाटत नव्हते.
 आपण काहीतरी चुकतोय, हेच त्याच्या गावी नव्हते. वापरून झाल्यानंतर या पाउचचे करायचे काय, हाच प्रश्न त्याला पडला असणार. त्या माणसाने तो पाउच तिथेच ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात टाकायला पाहिजे होता. त्या डब्यात कवडीमोल किमतीच्या अनेक वस्तू सकाळपासून पडत होत्या. कोणीतरी सहज जाता-येता, त्यात पिंकही मारीत होते. हा डबा संध्याकाळी तो पानवाला कोपऱ्यावर ठेवलेल्या कचऱ्याच्या कुंडीत अथवा कुंडीजवळ उपडा करणार होता. म्हणजे सुपारी खाऊन पाउच रस्त्यावर टाकून देणे आणि संध्याकाळी कचऱ्याचा डबा कुंडीजवळ रिकामा करणे.
 या दोन्ही क्रिया मग काय करणार ?' या असाहाय्यतेतूनच आल्या आहेत.
 हे थांबवायचे कसे हाच खरा मोठा गहन प्रश्न आहे. सांगून-सांगून माणसाचे प्रबोधन करत राहायचे, हा एक मार्ग आहे, पण हा खूप मंदगतीचा मार्ग आहे. याचे परिणाम नक्की चांगलेच आहेत, पण आपण शोधत आहोत गतिशील मार्ग, कारण आपण वेगवान युगात वावरत आहोत. नको असलेल्या वस्तूची संख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्याच वेगाने आपल्याला त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. आम्ही एका दुकानात खरवस विकत घेतला. आम्ही किंमत विचारली, तेव्हा तो दुकानदार म्हणाला, "खरवस ५० रुपयांचा आणि डबा ३५ रुपयांचा असे ८५ रुपये द्या." आम्ही म्हटले, "आम्हाला डबा नको. तो दुकानदार म्हणाला, "आत्ता ३५ रुपये देऊन डबा घेऊन जा, डबा स्वच्छ धुवा आणि परत घेऊन या, ३५ रुपये घेऊन जा." एका प्लॅस्टिकच्या पिशवीचा प्रश्न किती सहजतेने सुटला होता. अन्यथा हाच खरवस त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून दिला असता, लोकांनी घरी जाऊन खरवस काढून घेतला असता आणि प्लॅस्टिकची पिशवी साफ न करता वाऱ्यावर सोडून दिली असती.

 आपण क्षणभर कल्पना करू या. बाजारातील भाजीवाल्या बाईंकडून आपण भाजी खरेदी केली आणि आपण तिच्याकडे पिशवी मागितली. तिने पातळ


वापरा आणि वापरत राहा * २५