Jump to content

पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या तेल काढण्यातसुद्धा वाहतुकीचा खर्च हीच एक मोठी अडचण आहे. मी माझ्या परीनं या प्लॅस्टिकचा उपयोग करून त्याच्यापासून निर्माण होणारा कचरा शून्य केला आहे. मी या पातळ प्लॅस्टिकपासून ५'x ९' आकाराच्या छोट्याछोट्या अशा वेष्टण पिशव्या (Packing Pouch) बनवतो आणि त्या आमच्या कारखान्यात पॅकिंगसाठी वापरतो. आमच्या अजूबाजूला राहणारे जे नागरिक जागरूक आहेत ते मला त्यांच्याकडील पातळ प्लॅस्टिक आणून देतात. रस्त्यावर उनाड मुलाप्रमाणे पसरलेल्या पातळ प्लॅस्टिकला कामाला लावल्यामुळे त्याचा उपद्रव थांबला आहे. ज्यांच्याकडे कारखाना नाही ती मंडळी त्यांच्या घरात तयार होणाच्या पातळ, मऊ, बाजारात किंमत नसलेल्या प्लॅस्टिकपासून अशा गाद्या, सॉफ्ट टॉइज बनवू शकतात. कमीत कमी ह्या प्रकारचे प्लॅस्टिक रस्त्यावर न टाकता घरात साठवू शकतात. ह्या प्रकारचे प्लॅस्टिक साठवण्यासाठी खूप कमी जागा लागते. एक प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. असे प्लॅस्टिक एकत्र गोळा झाले की तुम्हांलादेखील नवीन कल्पना सुचू शकेल.
९) सॅनिटरी नॅपकिन : ह्यांची विल्हेवाट अॅनसीनरेशन पद्धतीने जाळून करायला हवी. पण ती सुविधा आपल्याकडे नाही. तूर्तास घमेल्यात वाळू घालून गच्चीवर जाऊन जाळणे याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. हा १०० टक्के योग्य मार्ग नाही पण कचराकुंडीत अथवा ड्रेनेज लाईनमध्ये टाकण्यापेक्षा गच्चीत नेऊन घमेल्यात जाळणं जास्त चांगलं.
१०) E-Waste : हा नव्या युगाचा कचरा आहे. तो वाटेलतसा टाकणं घातक आहे. ह्या वस्तू घेणारी मान्यवर मंडळी सरकारने नेमली आहेत. आपण ज्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि संगणक खरेदी करतो त्या पुरवठादाराकडून वस्तू घेतानाच हा E-Waste कचरा तू परत घ्यायला हवास अशी अट घालावी. कमीतकमी त्याच्याकडून E-Waste कचरा कोण घेतो त्याची माहिती तरी घ्यावी.
 एवढं वाचल्यानंतर त्याप्रमाणे वागायला लागलात तर 'कचरा करा' असं सांगितलं, तर तुमच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभ राहील! शून्य कचऱ्यासाठी मी काहीतरी करायला हवं, असं तुम्हांला वाटणं आवश्यक आहे.

*

कचऱ्याचा खरा प्रश्न आणि त्याचे उत्तर * ९