पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेटे, एम. वाय. संरक्षण खंड यांचा विचार न करता अत्यंत वेगाने शत्रूवर हल्ला करून, एकट्याने शौर्य गाजवून शत्रूचे दोन खंदक उद्ध्वस्त केले. शत्रूच्या हलक्या मशीनगनला त्यांच्या हालचालीची ख़बर मिळाली व त्याने (शत्रूने) प्रतिकार केला. शांताराम शिंदे हे तेव्हा शत्रूच्या खंदकांपर्यंत सरपटत जाऊन हातबॉम्ब पेरण्याचे काम करत होते. हे काम करत असतानाच हातबॉम्बचा स्फोट होऊन शिंदे मृत्युमुखी पडले. | शिंदे यांनी आपली कामगिरी बजावताना शत्रूच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले आणि अनेकांनी शरणागती पत्करली. अतुल्य शौर्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि आपल्या कामावरील निष्ठा या गुणांच्या सामर्थ्यावर त्यांनी आपल्या मातृभूमीची सेवा केली. शेटे, एम. वाय. भूसेना - लेफ्टनंट कर्नल वीरचक्र १३ मे १९४३ । | एम.वाय. शेटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर दि. १३ मे १९४३ पासून त्यांनी सैन्याच्या पहिल्या ग्रेनेडियर्स तुकडीमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. | दि. ११ फेब्रुवारी १९४८ रोजी कॅप्टन शेटे यांना त्यांच्या कंपनीवर शत्रूचा जोरदार हल्ला झाला असून कंपनीकडील दारूगोळा कमी पडत असल्याची बातमी मिळाली. त्यांनी ताबडतोब त्यांच्याजवळील दोन तुकड्या एकत्र केल्या व दारूगोळ्याच्या दोन राखीव पेट्या घेऊन आगेकूच केली. त्यांनी एका तुकडीला पिछाडी सांभाळण्याची सूचना दिली व दुस-या तुकडीसह शत्रूच्या जोरदार गोळीबाराला न जुमानता ते मोकळ्या मैदानात पुढे सरकू लागले. शत्रूने त्यांची दिशा अचूक पकडली व त्यांनी बारीकशी हालचाल करताच तीन दिशांनी जोरदार गोळीबारास सुरुवात केली. अशा परिस्थितीत त्यांनी एक तास आपली बाजू धरून ठेवली. दरम्यान त्यांचे दोन जवान जखमी झाले. तरीदेखील त्यांनी टेहळणी तुकडीपर्यंत दारूगोळा पोहोचवला. त्यामुळे त्यांच्या कंपनीला झालेले नुकसान भरून काढण्यात यश आले. आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी दीर्घकाळ शत्रूच्या जवळ मोर्चा धरून ठेवला व आपल्या कंपनीला दारूगोळा पुरवण्यात यश मिळवले. त्यांच्या या धाडसामुळे व कौशल्यामुळे या मोहिमेत यश मिळविणे आपल्या सैन्याला शक्य झाले. त्यांच्या या पराक्रमासाठी दि. ११ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांना 'वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. । श ५६२ शिल्पकार चरित्रकोश